धक्कादायक! चौथ्या मजल्यावर राहतो मुलगा; दुसऱ्या मजल्यावर 3 दिवस पडून होता आईचा मृतदेह

धक्कादायक! चौथ्या मजल्यावर राहतो मुलगा; दुसऱ्या मजल्यावर 3 दिवस पडून होता आईचा मृतदेह

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जून : मुलाने आई-वडिलांना आश्रमात सोडून आल्याचे वृत्त आपण अनेकदा ऐकलं असेल. मुलांनी आई-वडिलांना दिलेल्या त्रासाच्या अनेक बातम्या वारंवार माध्यमांमध्ये येत असतात. मात्र नवी दिल्लीत घडलेला हा प्रकार अत्यंत भयंकर आणि लज्जास्पद आहे. पालक आणि मुलांच्या नात्यामध्ये इतका दुरावा कसा येऊ शकतो हा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मालवीय नगरमधील एका घरात मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावर 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह खोलीत पडलेला आढळला. मृतदेह 3 दिवस घरात पडून होता. पोलिसांनी तपास केला असता वृद्ध महिलेचा मुलगा त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत असल्याचे आढळले, पण त्यालाही आईच्या मृत्यूची माहिती 3 दिवसानंतर मिळाली.

हे वाचा-पुण्यात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडात खळबळजनक खुलासा, लहान भाऊच निघाला आरोपी

पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर नेमका प्रकार समोर आला. जेव्हा मुलाची चौकशी केली गेली तेव्हा मुलगा दिल्लीत असला तरी 2-3 दिवस तो घरा बाहेर असल्याचे सांगत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण नैसर्गिक मृत्यूचे आहे. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पण हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले की, मुलाला आपल्या आईची विचारपूस करण्यासाठीही वेळ मिळाला नाही. आपल्या मुलाची वाट पाहत वृद्ध महिलेने जीव सोडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दिल्ली महिला आयोगानेही नोटीस पाठवली आहे.

 

 

 

 

First published: June 30, 2020, 7:28 PM IST
Tags: mother

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading