दिल्ली हिंसाचाराचा मास्टर माइंड ताहिर हुसैनचा खुलासा; चौकशीदरम्यान दिलं धक्कादायक कारण

दिल्ली हिंसाचाराचा मास्टर माइंड ताहिर हुसैनचा खुलासा; चौकशीदरम्यान दिलं धक्कादायक कारण

दिल्ली हिंसाचारात IB अधिकारी अंकित शर्मा यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : आम आदमी पक्षाचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन याने दिल्ली पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा केला आहे. ताहिर हा दिल्ली हिंसाचाराचा मास्टर माइंड आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा मी 2017 मध्ये आपचा नगरसेवक झालो, तेव्हापासूनच मला राजकीय आणि पैशांच्या मदतीने हिंदूंना धडा शिकवण्याची इच्छा होती. सरकारी जबाबानुसार ताहिर हुसैन याला या कामात खालिद सैफी आणि पीएफआय याची मदत होती. दिल्ली पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे.

ताहिर हुसैन याने दिल्ली पोलिसांच्या तपासात हे कबूल केलं की – खालिद सैफी यांनी सांगितले की तुमच्याकडे राजकीय पॉवर आणि पैसे दोन्ही आहेत. ज्याचा वापर हिंदूंच्या विरुद्ध आणि समाजासाठी करतील. मी यासाठी कायम तयार राहिन. त्याने सांगितले..त्याने सांगितले की काश्मीरात कलम 370 हटविल्यानंतर खालिद सैफी माझ्याक़डे आला होता. तो म्हणाला, यंदा आपण गप्प बसणार नाही...

हे वाचा-चीन ऐकण्यास नाही तयार; दोन्ही देशांच्या कमांडरांची बैठक राहणार निष्फळ

यादरम्यान राममंदिराच्या निर्णयासह सीएए कायदाही आला होता. तेव्हा मला वाटलं की खूप झाल...आता पाऊल उचलायला हवं..ताहिर हुसैनने सांगितल्यानुसार 8 जानेवारी रोजी खालिद सैफीने मला जेएनयू (JNU) चे पूर्व विद्यार्थी उमर खालिदशी शाहीन बागमध्ये पीएफआयच्या कार्यालयात भेट घडवून आणली होती. जेथे उमर खालिद म्हणाला की तो मारणे आणि मरण्यासाठी तयार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 2, 2020, 9:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading