• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकींच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकींच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

काल तालिबांनीनीदेखील याबाबत वक्तव्य जारी केलं होतं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 18 जुलै: पुलित्‍जर पुरस्‍कार विजेता पत्रकार दानिश सिद्दीकी (Journalist Danish Siddiqui) यांच्या मृत्यूनंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. इस्त्राइल-तालिबानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचं कव्हरेज करण्यासाठी गेलेले भारतीय पत्रकार दानिक सिद्दीकी यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या आढळल्या आहेत. काबुलस्थित भारतीय दुतावासाने त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र जारी केलं आहे. पत्रकार दानिश सिद्दीकी (Journalist Danish Siddiqui) यांच्या मृत्यूनंतर (Death) 17 जुलै रोजी तालिबानने  (Taliban) एक वक्तव्य जारी केलं होतं. तालिबानने दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं. शुक्रवारी सिद्दीकी कंधार (Kandahar) मध्ये अफगानी सुरक्षा दल (Afghan forces) आणि तालिबानिंमध्ये सुरू असलेली चकमक कव्हर करीत होते. तेव्ही त्यांची हत्या करण्यात आली. हे ही वाचा-VIDEO : Journalist Danish Siddiqui च्या मृत्यूनंतर तालिबानींनी जारी केलं वक्तव्य रेड क्रॉसवर मृतदेह सोपवला समाचार एजन्सी रॉयटर्ससोबत काम करणारे दानिश यांचा मृतदेह रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समिनीला (ICRC) सोपविण्यात आलं आहे. दानिश सिद्दीकी यांनी करिअरची सुरुवात टीव्ही रिपोर्टर म्हणून केली होती. नंतर ते फोटोग्राफीकडे वळले आणि रॉयटर्ससाठी फोटो जर्नालिस्ट म्हणून ते काम करत होते. 13 जुलैला त्यांनी कंदाहारमधून केलेलं ट्वीट शेवटचं ठरलं. रात्रभर चाललेल्या चकमकींविषयी त्यांनी लिहिलं होतं आणि फोटो, व्हिडीओही टिपले होते. 2018 मध्ये रोहिंग्य शरणार्थींबाबतच्या बातम्या आणि कव्हरेजबद्दल त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published: