Home /News /national /

धक्कादायक! पुण्यातील क्वारंटाइनमधील काही जण बेपत्ता, हजर होण्याचं पोलिसांचं आवाहन

धक्कादायक! पुण्यातील क्वारंटाइनमधील काही जण बेपत्ता, हजर होण्याचं पोलिसांचं आवाहन

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

पुणेकरांना याबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी पोलिसांना कळवावं असं आवाहन करण्यात आलं आहे

    पुणे, 23 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना राज्य सरकारने क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं आहे. कम्युनिटीमध्ये कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी परदेशातून भारतात आलेल्यांना पुढील किमान 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पुण्यात (Pune) परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं होतं. शिवाय त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे. संबंधित - पुण्यात कोरोनाच्या भीतीने आईने घरात कोंडलेल्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न मात्र त्यातील काहीजण अचानक बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलिसांनी यांना हजर राहण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यावेळी पुणे पोलिसांनी पुणेकरांनाही मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांना क्वारंटाइनचा शिक्का असलेला व्यक्ती दिसल्यास पुणे पोलिसांना 1800 233 4130 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. पुणे पोलिसांची 136 टीम क्वारंटाइनमध्ये राहायला सांगितलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. बेपत्ता झालेले कदाचित त्यांच्या गावी वा दुसरीकडे वास्तव्यास गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान 'दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत आहे. आपल्याला या संकटावर मात करायची आहे. उद्या सकाळपासून महाराष्ट्रभर कलम 144 लागू करणार,' अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे उद्या (सोमवार)सकाळपासून महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. संबंधित - कोरोनाची दहशत, संशयातून गर्भवती महिलेला मारहाण; जीवेमारण्याचा केला प्रयत्न
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या