Home /News /national /

दलितांचे केस कापले म्हणून न्हाव्याला धक्कादायक शिक्षा; सामाजिक बहिष्काराला वैतागून कुटुंबाची आत्महत्येची धमकी

दलितांचे केस कापले म्हणून न्हाव्याला धक्कादायक शिक्षा; सामाजिक बहिष्काराला वैतागून कुटुंबाची आत्महत्येची धमकी

आजही आपल्या देशातून अशा घटना समोर येत आहे. ही बाब संताप वाढवणारी आहे.

    म्हैसूर, 20 नोव्हेंबर : कर्नाटकातील (karnatak) म्हैसूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका न्हावीवर गावकऱ्यांनी 50000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे त्याने अनुसूचित जाती-जमाती (ST-SC) समुदायाच्या लोकांचे केस कापले म्हणून त्याला हा दंड ठोठावण्यात आला. ही घटना नानजनगुगु भागातील हल्लारे गावातील आहे. व्यवसायाने न्हावी असलेले मल्लिकार्जुन शेट्टी यांनी सांगितले की, त्यांच्यावर 50000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय स्थानिकांनी त्याच्या कुटुंबाचा सामाजिक बहिष्कार केला आहे. दंडामुळे कुटुंब त्रस्त मल्लिकार्जुन यांनी सांगितलं की, यापूर्वीदेखील अनेकवेळा त्यांच्यावर इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी दोन वेळा शेट्टी यांनी दंड भरला आहे. त्यांनी सांगितलं की, गावातील चन्ना नाइक आणि दुसरे लोक त्याला त्रास देत आहे. त्याने एससी आणि एसटी समुदायातील लोकांचे केस कापले आणि दाढी केली त्यामुळे त्याला धमकीही दिली जात आहे. हे ही वाचा-धक्कादायक! BMW वर लघुशंका करण्यापासून रोखलं म्हणून गार्डला पेट्रोल टाकून पेटवलं कुटुंबाने दिली आत्महत्येची धमकी न्हाव्याने सांगितले की, त्याने याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका आहे. ते म्हणाले की, जर अधिकाऱ्यांनी त्यांची मदत केली नाही तर ते कुटुंबासह आत्महत्या करतील. त्यांच्याकडे दंडाची रक्कम भरण्याचे पैसेही नाहीत. आणि नाही सामाजिक बहिष्कार सहन करण्याची क्षमता आहे. काही महिन्यांपूर्वी दिली होती सूचना तक्रारीत मल्लिकार्जुन यांनी सांगितलं की, चन्ना नाइक आणि त्याचे काही सोबती काही महिन्यांपूर्वी दुकानावर आले होते. त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती व जमातीच्या समुदायातील लोकांचे केस कापले म्हणून दंड लावला जात आहे. त्यांनी सामाजिक बहिष्कार केल्याचं सांगितलं. कर्नाटक समाज कल्याण विभागाने नुकताच एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार सांगितलं आहे की, राज्यात सरकारी सलून सुरू केले जावेत, कारण राज्यात अनेक ठिकाणी जातीभेदभाव केल्याने दलितांचे केस कापले जात नाहीत. केरळ सरकारने राज्यात सरकारी सलून सुरू केले आहेत. ग्रामीण भागात सुरू केलेल्या या सलूनमध्ये दलित आपले केस कापू शकतात आणि दाढीही करू शकतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Karnataka

    पुढील बातम्या