मराठी बातम्या /बातम्या /देश /

Shocking ! मुख्याध्यापकासह चार शिक्षकांनी मिळून 10वीच्या विद्यार्थीनीवर केला सामूहिक बलात्कार, शिक्षिकेने बनवला VIDEO

Shocking ! मुख्याध्यापकासह चार शिक्षकांनी मिळून 10वीच्या विद्यार्थीनीवर केला सामूहिक बलात्कार, शिक्षिकेने बनवला VIDEO

मध्य प्रदेशातील घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कोणताही भाऊ आपल्या बहिणीवर बलात्कार कसा करू शकतो असा सवाल उपस्थित केला जात आहे. पत्नी रागाने सासरी निघून गेली म्हणून या भावाने स्वत:च्या बहिणीलाही तिच्या सासरहून आणलं आणि तिच्यावर सातत्याने बलात्कार केला.

मध्य प्रदेशातील घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कोणताही भाऊ आपल्या बहिणीवर बलात्कार कसा करू शकतो असा सवाल उपस्थित केला जात आहे. पत्नी रागाने सासरी निघून गेली म्हणून या भावाने स्वत:च्या बहिणीलाही तिच्या सासरहून आणलं आणि तिच्यावर सातत्याने बलात्कार केला.

Principal and teachers gang raped on girl: गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकासोबत इतर चार शिक्षकांनी मिळून विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • Published by:  Sunil Desale

अलवर, 8 डिसेंबर : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने (School Principal) आणि इतर तीन शिक्षकांनी मिळून दहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार (Class 10 girl gangraped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थीनीने आरोप केला आहे की, मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांनी मिळून हे गैरकृत्य केलं इतकेच नाही तर महिला शिक्षिकेनेही त्यांना साथ दिली. या धक्कदायक आणि लाजीरवाण्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

शिक्षिकेने शूट केला व्हिडीओ

ही घटना राजस्थानातील अलवर जिल्ह्यात घडली आहे. अलवर जिल्ह्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थीनीने मुख्याध्यापकांसह इतर शिक्षकांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आपला तपास सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात महिला शिक्षिकेने व्हिडीओ शूट केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थीनीने केला आहे.

मांढण पोलीस ठाण्याचे अधिकारी मुकेश यादव यांनी सांगितले की, शाळेच्या मुख्याध्यापकासह इतर शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन महिला शिक्षिकांचाही समावेश आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ते ट्रक चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी मूकबधिर आहे आणि मुलगी इयत्ता 20वीत शिक्षण घेते.

वाचा : औरंगाबादेत लग्न मंडपातून 36 लाखांच्या दागिन्यांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, ते कामानिमित्त बाहेरगावी होते. ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना कळाले की आपली मुलगी शाळेत जात नाही. शाळेत न जाम्यामागचं कारण विचारलं असता ती रडू लागली आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीने सांगितले की, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक गेल्या एक वर्षापासून तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करत आहेत.

व्हिडीओ व्हायरल करुन जीवे मारण्याची धमकी

केवळ शिक्षकच नाही तर या कृत्यात महिला शिक्षिकाही सहभागी असल्याचं पीडित मुलीने सांगितलं आहे. पुरुष शिक्षक घृणास्पद कृत्य करत असताना महिला शिक्षिका त्यचा व्हिडीओ शूट करत होत्या. त्या सर्वांनी मला व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

वाचा : कॉलेजच्या गेटसमोरून केलं अपहरण; बळजबरीनं लग्न लावत युवतीवर बलात्कार

शिक्षिकेच्या घरी घडला प्रकार

पीडित मुलीने सांगितले की, शाळेतील दोन महिला शिक्षकांनी तिला मोफत ड्रेस आणि पुस्तके देण्याचे आमिष दाखवत फी भरणार असल्याचं सांगितलं. नंतर शाळेजवळ राहणाऱ्या एका महिला शिक्षिकेच्या घरी तिला नेलं. तेथे शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर दोन शिक्षक दारू पित होते. तेथे गेल्यावर महिला शिक्षिकेने तिचे कपडे काढले त्यानंतर चारही पुरुषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या दरम्यान दोन्ही महिला शिक्षिका त्याचा व्हिडीओ शूट करत होत्या.

First published:

Tags: Crime, Gang Rape, Rajasthan