मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोनापासून वाचण्यासाठी गेले आणि घात झाला, 46 जणांचा जीव धोक्यात

कोरोनापासून वाचण्यासाठी गेले आणि घात झाला, 46 जणांचा जीव धोक्यात

हा व्हायरस वेगात पसरू नये, यासाठी प्रत्येक देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

हा व्हायरस वेगात पसरू नये, यासाठी प्रत्येक देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

हा व्हायरस वेगात पसरू नये, यासाठी प्रत्येक देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

नवी दिल्ली, 17 मार्च : चीनमधून जगभरातील अनेक देशांमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस सध्या डोकेदुखी ठरत आहे. हा व्हायरस वेगात पसरू नये, यासाठी प्रत्येक देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. इटली, फ्रान्स आणि इटली या देशांमध्ये तर शटडाऊन करण्याची वेळ ओढावली आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिकांनाही चिंता सतावू लागली आहे. अशातच हा व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी प्रत्येकजण शक्य तितक्या सगळ्या उपाययोजना करून पाहात आहे. मात्र याच कोरोनापासून वाचण्यासाठी वैज्ञानिक आधार न घेता केलेली उपाययोजना 46 जणांसाठी घातक ठरली आहे.

करोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून दक्षिण कोरियामधील एका चर्चमध्ये देण्यात आलेल्या 'पवित्र' पाण्यामुळे 46 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

" isDesktop="true" id="441889" >

या पवित्र पाण्यामुळे करोना विषाणूंची लागण होणार नाही आणि झाली तरी त्यांचा खात्मा होईल या अंधश्रद्धेतून हे पाणी लोकांना देण्यात आलं. मात्र त्यामुळे झालं उलटंच. कोरोनापासून लोकांचा बचाव होण्यापेक्षा तब्बल 46 लोक कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उपाययोजनांचं पालन करण्याची गरज असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा-FACT CHECK - उकाडा वाढल्यानंतर महाभयंकर कोरोनाव्हायरसचा नाश होणार? काय सांगतात तज्ज्ञ

दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत बाधित भागातून एकूण 1063 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 794 जणांना भरती करण्यात आले आहे. भरती करण्यात आलेल्यांपैकी 717 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 39 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

First published:

Tags: Corona