Home /News /national /

धक्कादायक प्रकरण! डोक्यावरचं कर्ज हलकं करण्यासाठी स्वतःलाच केलं किडनॅप

धक्कादायक प्रकरण! डोक्यावरचं कर्ज हलकं करण्यासाठी स्वतःलाच केलं किडनॅप

आपल्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी (father) पैसे दिले नाहीत, म्हणून त्याने चक्क स्वतः च्या अपहरणाचा (Kidnapping) कट रचला. आणि त्याच्या मित्रांद्वारे खंडणी (Ransom) मागू लागला.

    जयपूर, 07 डिसेंबर : अपहरण आणि त्यानंतर खंडणीसाठी फोन ही प्रकरणं पोलिसांसाठी नवी नाहीत. पण एक वेगळंच अपहरण नाट्य जयपूर पोलिसांनी नुकतंच उलगडलं. आपल्या डोक्यावर असलेलं कर्ज फेडण्यासाठी हातात पैसे नाहीत आणि वडील ते देत नाही. म्हणून तरुण मुलाने स्वतःच स्वतःला किडनॅप करवून घेतलं आणि वडिलांकडून खंडणी उकळण्याचा घाट घातला, पण पोलीस तपासात बिंग फुटलं. आपल्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी (father) पैसे दिले नाहीत, म्हणून जयपूरमधल्या (jaipur) एका मुलाने अजब शक्कल लढवली आहे. वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी त्याने चक्क स्वतः च्या अपहरणाचा (Kidnapping) कट रचला. आणि त्याच्या मित्रांद्वारे खंडणी (Ransom) मागू लागला. पण अवघ्या काही तासातच जयपूर पोलिसांनी (jaipur Police) या प्रकरणाचा छडा लावला असून अपहरणाचा कट रचणाऱ्या पोराला गजाआड केलं आहे. जयपूर पोलिसांना अशी माहिती मिळाली होती, की अपहरणकर्त्यांनी मालवीय नगर येथून एका मुलाचं अपहरण केलं आहे. तसेच अपहरण करून त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या व्हिडिओमध्ये अपहरणकर्त्यांनी मुलाचे हात बांधले होते आणि दोन जण त्याला बेदम मारहाण करीत होते. असा हा धडकी भरवणारा व्हिडिओ अजमेरच्या केकरी येथे राहणाऱ्या मुलाच्या वडिलांना पाठविण्यात आला होता. हा व्हिडिओ समोर येताच कुटुंबामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. म्हणून पोलिसांनी तातडीने पावलं उचलत अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला आणि अपहरणकर्त्यांना अटक केली. जयपूरचे डीसीपी राहुल जैन यांनी सांगितलं की, केकरी येथील रहिवासी प्रेमसिंग याने आपल्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली होती. तसेच मुलगा गेल्या 2 दिवसांपासून वडीलांना पैसे मागत होता. परंतु रात्री बारा वाजता हा व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये अपहरणकर्त्यांनी मुलाला बांधून अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी अपहरणकर्त्यांची चौकशी केली असता, तक्रारदार वडीलांचा मुलगा विकास याने स्वतः अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले. या प्रकरणात, त्याने आपले दोन मित्र यादराम गुर्जर आणि लोकेंद्र सिंग या मित्रांची मदत घेतली होती. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विकासने पोलिसांना सांगितले की, तो क्रेडीट कार्ड बनवण्याचा व्यावसाय करतो. तसेच त्याच्यावर 70 हजारांचे कर्ज असल्यामुळे त्याने अपहरणाचा कट रचल्याची कबुली दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Jaipur, Kidnapping

    पुढील बातम्या