कानपूर, 25 डिसेंबर: राष्ट्रीय गुन्हेगार नोंदणी कार्यालयाच्या ( NCRB) आकडेवारीनुसार देशात दर दिवसाला 88 बलात्काराच्या घटना घडतात. त्यामुळं महिलांना देवी मानणारा हा देश महिलांसाठी खरंच सुरक्षित आहेत का ? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. देशात बलात्कार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशीच एक थरकाप उडवणारी बलात्काराची घटना घडली आहे. एका नराधमाने पाच वर्षाच्या चिमुकलीला 50 रुपये देतो असं म्हणतं बलात्कार केला आहे. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण झालं असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशतील कानपूर येथील असून येथील 5 वर्षाच्या निष्पाप मुलीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घाटमपूरचे सीओ रवि सिंह यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
50 रुपयांचं आमिष दिलं होतं
मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी एका 5 वर्षाच्या चिमुकलीला 50 रुपयांचं आमिष दाखवून शेतात घेऊन गेला. तिथे त्यानं पीडित मुलीवर बलात्कार केला. ही मुलगी तिच्या बहिणीसोबत होती. पीडितेच्या बहिनेनं आरडाओरडा केल्यानंतर आसपास शेतात काम करणारी लोकं जमा झाली. त्यांनी घटनास्थळावर तरुणाला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी POCSO कायद्यांसोबतच इतर अनेक कलमांतर्गंत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गावात संतापाचं वातावरण
असं म्हटलं जात आहे की, आरोपी व्यक्ती गावांत एका नातेवाईकाकडे आला होता. त्यानं या पीडित मुलीला 50 रुपयाचं आमिष दाखवून तिला जवळच्या शेतात घेऊन गेला. त्याठिकाणी त्यानं या मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर गावामध्ये तणावाचं वातावरण झालं आहे. आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बहिणीने आरडाओरडा केला
पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पीडिताच्या कुटुंबियांनी या विरोधात घाटमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल केली आहे. कुटुंबियाच्या मते पीडित मुलगी टॉयलेटसाठी गेली होती. त्यावेळी तिची बहीणही सोबत गेली होती. त्यावेळी तिथे आरोपी तरुण पोहचला आणि त्यानं खाऊ देतो, 50 रुपये देतो असं आमिष दाखवून या चिमुकलीला शेतात घेऊन गेला.