मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशाला हादरवणारं हत्याकांड, सूनेनेच कुटुंबातील 4 सदस्यांचा केला खून; पोलिसांचा दावा

देशाला हादरवणारं हत्याकांड, सूनेनेच कुटुंबातील 4 सदस्यांचा केला खून; पोलिसांचा दावा

घरातील सूनेनेच कुटुंबातील 4 सदस्यांचा खून केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र अद्याप या हत्या करण्यामागील कारण समोर आलेलं नाही.

  • Published by:  Meenal Gangurde

एटा, 26 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या एटा येथे शनिवारी एका घरात 5 मृतदेह सापडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी रविवारी मोठा खुलासा केला आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांच्या संशयित मृत्यूचे कोडे सोडविण्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूनेने आपल्या कुटुंबातील सदस्यांना विष देऊन ठार मारल्यानंतर आत्महत्या केली. परंतु मृताच्या पतीने या प्रकरणात  सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

या प्रकरणात पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत, जी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइलचा तपशील, कुटुंबातील वाद इत्यादींचा शोध घेत  आहेत. त्याचवेळी मृताचे पती दिवाकर यांनी कुटुंबात  कोणत्याही प्रकारचा वैर नसल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालाच्या आधारे घरातील एका महिलेने अन्नात विष मिसळून सदस्यांची हत्या केली. एका निष्पाप मुलाचा गळा दाबून हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत घरातील कोणीही सदस्य जिवंत राहू नये हा प्रयत्न होता. घरातील चारही सदस्यांची हत्या केल्यानंतर महिलेने स्वत:चं हाताची नस कापून आणि हार्पिक पिऊन आत्महत्या केली.

या संपूर्ण प्रकरणात एसएसपी सुनील कुमार सिंह यांनी सांगितले की, 4 जणांना ठार मारल्यानंतर सून दिव्याने हाताची नस कापून आत्महत्या केली. सूनेने इतके गंभीर पाऊल का उचलले यामागील कारण तपासले जात आहे, मृताचा नवरा दिवाकर पचौरी रुरकी येथील फार्मास्युटिकल कंपनीत काम करतात. येथे आल्यानंतर त्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे. एकीकडे देशात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू असताना दुसरीकडे या मर्डर केसमुळे त्या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित -ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस सोमवारपासून कार्यभार स्वीकारण्याची शक्यता; म्हणाले...

First published:

Tags: Corona virus in india