धक्कादायक! लॉकडाऊनमुळे दुसऱ्या राज्यात अडकला पती, एकटं पाहून महिलेवर केला बलात्कार

धक्कादायक! लॉकडाऊनमुळे दुसऱ्या राज्यात अडकला पती, एकटं पाहून महिलेवर केला बलात्कार

महिला घरात एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

  • Share this:

शामली, 15 एप्रिल : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली आहे. यामुळे अनेक मजूर विविध राज्यांमध्ये अडकले आहे. त्यादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) शामली जनपदमधील एका रेशन डिलरने त्याच भागातील एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. लॉकडाऊनदरम्यान रेशन देण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर महिलेला जीवेमारण्याची धमकी देऊन फरार झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे

पीडितेने याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी रेशन डिलरला अटक केली आहे. शामलीमधील कांधला ठाणे हद्दीतील शेखजादगान भागातील आहे. येथे स्थानिक रेशनच्या दुकानात पीडित महिला रेशन आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी स्थानिक रेशन डिलर विनोदने घरी येऊन रेशन देईन असं सांगितलं. त्यांनतर सायंकाळी विनोद महिलेच्या घरी रेशन देण्याच्या बहाण्याने पोहोचला आणि महिलेला एकटं पाहून तिच्यावर बलात्कार केला.

महिलेचा पती लॉकडाऊनमुळं पंजाबमध्ये अडकला

रेशन डिलर विनोदने घरात घुसून बलात्कार केल्याचे महिलेने सांगितले. महिलेने सांगितल्यानुसार तिचा पती पंजाबमध्ये मजुराचे काम करतो. लॉकडाऊनपूर्वी तो पैसे घेण्यासाठी गेला होता. मात्र कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संख्येमुळे देशभरात लॉकडाऊन लागू केल्याने तो तेथेच अडकला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याचा तपास केला जात आहे.

संबंधित -

मराठवाड्यातल्या मदत केंद्रातून तेलंगणाचे 465 मजूर पळाले, प्रशासनाची झोप उडाली

मैत्रीचे बंध! मुस्लीम तरुण बौद्ध भिख्खू मित्रासाठी विहारात घेऊन गेला जेवण

प्रशासनाचा आदेशानंतर हिंदू-मुस्लीम रुग्णांसाठी कोविड-19 चे वेगवेगळे वॉर्ड

 

First published: April 15, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या