Home /News /national /

धक्कादायक! नोकरी नाही म्हणून बापाने पोटच्या पोरांचाच केला खून, नंतर केली आत्महत्या

धक्कादायक! नोकरी नाही म्हणून बापाने पोटच्या पोरांचाच केला खून, नंतर केली आत्महत्या

त्यांची पत्नी परतली तेव्हा घरात तिच्या मुलांचे मृतदेह जमिनीवर होते

    नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनी बंद पडल्याने अडचणीत सापडलेल्या 44 वर्षीय व्यक्तीने रविवारी हैदरपूर बडली मोर स्टेशनवर मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या केली. या व्यक्तीजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. मधूर मलानी असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मलानी आर्थिक संकटात सापडले होते आणि सहा महिन्यांपूर्वी सॅंड-पेपर उत्पादन कारखाना बंद झाल्यानंतर ते तणानात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की, मलानींचे आई-वडील त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत करीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुर आपली पत्नी रुपाली, मुलगी समिक्षा (14) आणि सहा वर्षांचा मुलगा श्रेयांश यांच्यासह दिल्लीच्या शालीमार बाग भागात राहत होता. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली घरी नसताना मलानींनी गळा आवळून मुलांची हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मुलांच्या मृत्यूचे वास्तविक कारण स्पष्ट होईल." मुला-मुलीची हत्या केल्यानंतर मलानी यांनी हैदरपूर बडली मोर मेट्रो स्थानकात मेट्रोसमोर येऊन आत्महत्या केली. दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर मलानी हैदरपूर बडली मोर मेट्रो स्थानकात पोहोचले आणि मेट्रोसमोर उडी मारली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यलो लाइनवर मेट्रो सेवा विस्कळीत झाली या घटनेमुळे यलो लाइनवरील गाड्यांच्या वेळापत्रकावर काही काळ परिणाम झाला होता. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) ट्विट केले की, “हैदरपूर बडली वळणावर घडलेल्या या घटनेमुळे समयपूर बडली ते जीटीबी नगर दरम्यान मेट्रो सेवा उशिराने सुरू आहे.” सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी शालिमार बाग पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाली, तर सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी मुलांच्या हत्येची माहिती मिळाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मधूर यांची पत्नी दुपारी तीन वाजता जवळच्या बाजारात गेल्याचे रूपालीने पोलिसांना सांगितले. मात्र जेव्हा ती परत आली तेव्हा तिला दोन्ही मुलांचा मृतदेह दिसला आणि पती तिथे नव्हता. आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (उत्तर पश्चिम) विजयंत आर्य यांनी दिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Delhi, Delhi crime, Delhi metro, Family sucide, Girl Murder

    पुढील बातम्या