मराठी बातम्या /बातम्या /देश /

भय इथले संपत नाही, मरणानंतरही मरण यातना, अंत्ययात्रेचा मन सुन्न करणारा व्हिडीओ

भय इथले संपत नाही, मरणानंतरही मरण यातना, अंत्ययात्रेचा मन सुन्न करणारा व्हिडीओ

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबाचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबियांनी आपला जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार केले.

  ओडिसा : अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबाचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबियांनी आपला जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मन सुन्न करणारा आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की कुटुंबातील अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत. त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. अशा परिस्थितीमध्येही मृतदेह घेऊन जात आहेत. स्मशानघाट नाल्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कुटुंबावर ही वेळ आली आहे. पावसाचं पाणी पार्थिवावर पडू नये म्हणून कुटुंबियांनी केळीच्या पानांचा आधार घेतला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी एकाही स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्याने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

  भोग इथले संपत नाही, मरणानंतरही यातना, बीडमधलं धक्कादायक वास्तव

  ओडिशा सरकारने 4 वर्षांपूर्वी एक योजना आणली होती. ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारासाठी 2 हजार रुपये मिळणार असं आश्वासन दिलं होतं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या योजनेचं काय झालं? असा सावल देखील उपस्थित होत आहे. ही धक्कादायक घटना ओडिसामधील कालाहांडी जिल्ह्यातील गोलामुंडा ब्लॉक इथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Odisha, Shocking news, Top trending

  पुढील बातम्या