वेळ आली होती पण...मजूराचा हात लिफ्टमध्ये अडकून तुटला आणि...

वेळ आली होती पण...मजूराचा हात लिफ्टमध्ये अडकून तुटला आणि...

लिफ्टमध्ये हात अडकल्याने त्याचा हात तुटला होता, हाडांत फ्रॅक्चर झालं होतं. प्राथमिक उपचारांनंतर, डॉक्टरांच्या टीमने त्वरित सर्जरी करण्याचं सांगितलं.

  • Share this:

जोधपूर, 3 डिसेंबर : एका फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मजूराचा हात लिफ्टमध्ये अडकून तो कापला गेल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी सकाळी मजूराचा हात लिफ्टमध्ये अडकला. लिफ्टमध्ये अडकल्याने हात गंभीररित्या तो जखमी झाला. त्या मजूराला लगेगच महात्मा गांधी रुग्णालयात आप्तकालीन वॉर्डमध्ये आणण्यात आलं. प्राथमिक उपचारांनंतर, डॉक्टरांच्या टीमने त्वरित सर्जरी करण्याचं सांगितलं.

ऑपरेशनआधी त्या रुग्णाच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. सीटी एंजियो एक्स-रे, ब्लड टेस्ट, कोरोना टेस्ट केली गेली. या रुग्णाच्या सर्व चाचण्या सामान्य आल्या. त्यानंतर 24 तास त्याला डॉक्टरांनी ऑब्जर्वेशनमध्ये ठेवलं.

 (वाचा - 1 जानेवारीपासून बदलणार FASTagचे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस)

लिफ्टमध्ये हात अडकल्याने त्याचा हात तुटला होता, हाडांत फ्रॅक्चर झालं होतं. पण डॉक्टरांनी त्याचा होत पुन्हा जोडून किमयाच केली आहे. संपूर्ण तुटलेल्या हाताला पुन्हा रक्तवाहिन्या, मसल्स, अंगठा, इतर बोटं या सगळ्यात मूवमेंट व्हावी अशारितीने जोडला.

आता 21 दिवसांनंतर, हाताची स्थिती पाहून त्याला फिजिओथेरेपीसाठी नेलं जाईल. संपूर्ण तुटलेला हात अशाप्रकारे पुन्हा जोडून डॉक्टरांनी त्याला नवं जीवदानचं दिल्याची भावना व्यक्त होत आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 3, 2020, 10:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या