हादरवणारी घटना; उपासमारीमुळे 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई 3 दिवस शेजारीच होती बसून

हादरवणारी घटना; उपासमारीमुळे 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई 3 दिवस शेजारीच होती बसून

पोलिसांनी जेव्हा या घरात प्रवेश केला तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला..मुलाच्या शरीराला किडे-मुंग्या लागू नये म्हणून आई सतत त्याचं अंग पुसत होती.

  • Share this:

चेन्नई, 1 सप्टेंबर : तामिळनाडूमधील तिरुनिंद्रावूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील 7 वर्षीय मुलगा सॅम्युअल याचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. तीन दिवसांपर्यंत मुलाची आई सरस्वती त्याच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली आणि त्याच्या मृतदेहाला मुंग्या लागू नये म्हणून सतत त्याचं शरीर पुसत होती. हा भाग चेन्नईपासून काही अंतरावरच आहे.

शेजारच्यांना दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस सरस्वतीच्या घरी गेल्यानंतर सरस्वती आपल्या मुलाच्या मृतदेहाशेजारी बसली होती. पोलिसांनी तातडीने मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. इन्स्पेक्टर गुनासेकरन यांनी सांगितले की, ते दृश्य पाहून टीमला धक्काच बसला.

तीन दिवसांपूर्वी झाला होता मुलाचा मृत्यू

गुनासेकर यांनी सांगितले की, टीमने दरवाजा ठोठावला. सरस्वती यांनी दार उघडलं आणि पोलिसांना मुलाच्या मृतदेहाशेजारी घेऊन गेले. सरस्वतींनी पोलिसांना सांगितले की, मी मुलाच्या मृतदेहाला थोड्या वेळासाठीही लांब केलं नाही, नाहीतर त्याला मुग्यांनी खाल्लं असतं. पोलिसांनी सांगितले की, उपासमारीमुळे ंमुलाच्या शरीराची हाडं दिसत होती. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हे ही वाचा-रेस्क्यू करताना हात सुटला आणि घात झाला, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

आईचं मानसिक आरोग्य ढासळलं

पोलिसांनी सरस्वती यांच्या कुटुंबीयांची बातचीत केली. त्यांनी सांगितले की सरस्वती या मानसिक रुग्ण आहेत. 7 वर्षांपूर्वी त्या पती जोस याच्यापासून वेगळी होती. त्या सीटीएच रोडवरील दुसऱ्या मजल्यावर राहत होत्या. तर पहिला मजला आणि तळमजल्यावर त्यांचे नातेवाईक राहत होते. त्या फार कोणाशी संबंध ठेवत नव्हत्या.

क्लिनिक बंद झाल्याने होत होती उपासमार

सरस्वती पहिल्यांदा होमियोपॅथीची डॉक्टर होती. त्यांचं एक क्लिनिक होतं. त्या लोकांवर उपचार करीत होती. मात्र पतीकडून वेगळं झाल्यानंतर त्यांचं मानसिक आरोग्य खालावलं. त्यांच्या नातेवाईकांसोबत प्रॉपर्टीसंबंधित वादही सुरू होता. त्या बंगळुरुत राहणाऱ्या आपल्या भावासोबत संपत्तीची केस लढत आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यात खूप परिणाम झाला होता. लॉकडाऊननंतप सरस्वतीचे क्लिनिक बंद झाले. त्यानंतर त्यांची उपासमार सुरू झाली.

Published by: Meenal Gangurde
First published: September 1, 2020, 6:14 PM IST
Tags: chennai

ताज्या बातम्या