लग्न टिकवण्यासाठी नवरा आणि बायको दोघंही जबाबदार असतात; पण लग्न टिकलं नाही, तर त्याचं खापर बहुतांश वेळा पुरुषांवर फोडलं जातं. पुरुषांचे विवाहबाह्य संबंध याला कारणीभूत मानले जातात; पण ग्लीडेन (Gleeden) या डेटिंग अॅपनं केलेल्या सर्व्हेमध्ये देशातल्या 10 पैकी 7 विवाहित स्त्रिया पुरुषांना धोका देतात असं समोर आलं आहे. याचं कारण पुरुष घरकामात स्त्रियांना मदत करत नाहीत, असंही यातून समोर आलं आहे. 'एशियानेट न्यूज'ने या संदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
लग्न न टिकण्यासाठी पुरुषांचे विवाहबाह्य संबंध किंवा पुरुषांचा तापट स्वभाव अशीच कारणं बहुतांशवेळा दिली जातात; मात्र परिस्थिती बदलते आहे. स्त्रियांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. ग्लीडेन या डेटिंग अॅपनं (Dating App) विवाहित स्त्री-पुरुषांच्या संबंधांवर नुकतंच एक सर्वेक्षण केलं. यात स्त्रिया विवाहबाह्य संबंध का ठेवतात, याचा सर्व्हे करण्यात आला. यात भारतातल्या 10 पैकी 7 स्त्रिया विवाहबाह्य संबंध (7 Woman Out Of 10 Cheat On Their Husband) ठेवतात व त्यासाठी पुरुषांचा घरकामातील कमी सहभाग कारणीभूत असतो, असं समोर आलं आहे. स्त्रियांचं म्हणणं असं आहे, की त्यांचं लग्न नीरस झाल्यानं त्यांनी परपुरुषांसोबत संबंध ठेवले आहेत. विशेष म्हणजे विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलांमध्ये जास्त संख्या मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या महानगरांमधल्या महिलांची आहे. पुरुष घरकामात स्त्रियांना मदत करत नाहीत, असं या स्त्रियांचं म्हणणं आहे. त्यामुळेच विवाहबाह्य संबंध ठेवल्याचं त्या म्हणतात.
(
धक्कादायक! पनवेलमध्ये 62 वर्षीय महिलेची 32 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या)
भारतात ग्लीडेनचे 5 लाखांपेक्षा जास्त युझर्स आहेत, तर जगभरात 50 लाखांपेक्षा जास्त युझर्स आहेत. यापैकी अनेक युझर्स विवाहित आहेत. भारतात 2017मध्ये हे अॅप लाँच झालं होतं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यातल्या 30 टक्के महिला युझर्स 34-49 या वयोगटातल्या आहेत आणि याच वयोगटातल्या महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे. 77 टक्के स्त्रियांनी नवऱ्याला फसवल्याचं या सर्वेक्षणात सांगितलं आहे. लग्न नीरस झाल्यानं आयुष्यात काहीच चांगलं नव्हतं. विवाहबाह्य संबंधांमुळे आयुष्य थोडं मसालेदार झालं, असं त्या स्त्रियांचं म्हणणं आहे.
भारतातील 5 लाख युझर्समधले 20 टक्के पुरुष व 13 टक्के स्त्रियांनी ते आपल्या जोडीदाराला फसवत असल्याचं मान्य केलं आहे. हे डेटिंग अॅप सुरक्षित आणि गोपनीय असल्यानं या अॅपवर नवीन व्यक्तींना भेटणं पसंत केल्याचं स्त्रियांनी म्हटलं आहे. या सर्वेक्षणात समलिंगी संबंधांच्या वाढत्या संख्येबाबतही चर्चा करण्यात आली आहे. ज्यांना पारंपरिक लग्न करण्यासाठी जबरदस्तीनं तयार करण्यात आलं, ते आता या अॅपवर समलिंगी जोडीदार शोधत आहेत. यात लेस्बियन आणि गे दोन्हीही प्रकारच्या व्यक्ती आहेत.
सर्वेक्षण केवळ 5 लाख युझर्सवरच करण्यात आलं आहे. भारताची लोकसंख्या 133 कोटींपेक्षा अधिक आहे. देशातल्या अनेक स्त्रिया हे अॅप वापरत नाहीत. तरीही या निष्कर्षांबाबत सखोल विचार करण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.