बापरे! एकाच सराफा दुकानातील 31 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, सोनं खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा शोध सुरू

देशावरील कोरोनाचं (Coronavirus) सावट काही कमी होताना दिसत नाही आहे. देशभरात अनेकांनी New Normal स्वीकारून जरी दैंनदिन आयुष्याला सुरुवात केली असली तरीही योग्य खबरदारी न बाळगल्यामुळे कोव्हिड-19 संक्रमित होण्याचा धोका वाढला आहे.

देशावरील कोरोनाचं (Coronavirus) सावट काही कमी होताना दिसत नाही आहे. देशभरात अनेकांनी New Normal स्वीकारून जरी दैंनदिन आयुष्याला सुरुवात केली असली तरीही योग्य खबरदारी न बाळगल्यामुळे कोव्हिड-19 संक्रमित होण्याचा धोका वाढला आहे.

  • Share this:
    इंदूर, 19 नोव्हेंबर: देशावरील कोरोनाचं (Coronavirus) सावट काही कमी होताना दिसत नाही आहे. देशभरात अनेकांनी New Normal स्वीकारून जरी दैंनदिन आयुष्याला सुरुवात केली असली तरीही योग्य खबरदारी न बाळगल्यामुळे कोव्हिड-19 संक्रमित होण्याचा धोका वाढला आहे. मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) देखील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे.  राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये एका सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात 31 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकाच दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी संक्रमित आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आरोग्य विभागाने या दुकानातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा शोध सुरु केला आहे. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने यासंदर्भात बुधवारी याबाबत माहिती दिली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या 'स्क्रीनिंग' टीमचे प्रभारी अनिल डोंगरे यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी याविषयी असे म्हटले की, शहरातील एमजी रोडवरील एका दागिन्यांच्या दुकानातील एकूण 72 कर्मचाऱ्यांचे सॅम्पल्स घेण्यात आले होते. यामधील 31 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एका खासगी लॅबमध्ये ही तपासणी करण्यात आली. (हे वाचा-सावधान! पुण्यात Covid च्या दुसऱ्या लाटेत 20 हजारापर्यंत वाढू शकतात कोरोना रुग्ण) दरम्यान सराफा दुकानं संसर्गमुक्त केली जात असल्याचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी  प्रवीण जाडिया यांनी सांगितले. त्याचबरोबर मागील काही दिवसांत या ठिकाणाहून खरेदी करणाऱ्या ग्राहकांचादेखील शोध घेतला जात आहे. या ग्राहकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आल्यास त्यांची चाचणी करून उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. मध्य प्रदेशातील इंदूर हा कोरोनाने सर्वांत जास्त प्रभावित झालेला जिल्हा आहे. 35 लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात 24 मार्चपासून 17 नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचे एकूण 36,055 रुग्ण समोर आले आहेत. यामधील 719 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नवीन रुग्णांची वाढती संख्या पाहता इंदूरमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. (हे वाचा-सलमानच्या घरी होणार होती लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी, पण कोरोनामुळे रंगाचा बेरंग) गेल्या महिन्यापासून कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. दिल्लीमध्ये देखील दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्याचबरोबर भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा देखील धोका आहे. महाराष्ट्र सरकारने देखील जानेवारी, फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने तयारी आणि सावधानतादेखील बाळगण्यास सुरुवात केली आहे.  दिवाळीमुळे लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यानेही संसर्ग वाढण्याची शक्यता वाढली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: