मराठी बातम्या /बातम्या /देश /

Instagram Reels बनवताना दुर्घटना, गळफास लागून 10वीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू

Instagram Reels बनवताना दुर्घटना, गळफास लागून 10वीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू

Accident while shoot Instagram reels: इंस्टाग्राम व्हिडीओ शूट करताना एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपले प्राण गमावले आहेत.

Accident while shoot Instagram reels: इंस्टाग्राम व्हिडीओ शूट करताना एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपले प्राण गमावले आहेत.

Accident while shoot Instagram reels: इंस्टाग्राम व्हिडीओ शूट करताना एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपले प्राण गमावले आहेत.

  • Published by:  Sunil Desale
इंदूर, 15 डिसेंबर : सध्या तरुणांमध्ये इंस्टाग्राम रिल व्हिडीओ (Instagram Reels video) शूट करण्याचं फ्याड असल्याचं पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे व्हिडीओ शूट करणं एका तरुणाच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. इंस्टाग्रामवर व्हिडीओ तयार करताना दुर्घटना होऊन एका 10वीच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एका गाण्यावर व्हिडीओ शूट करत असताना त्याला अचानक गळफास लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. (Accident while shooting Instagram Reels in Indore) मध्यप्रदेशातील इंदूर शहरात ही घटना घडली आहे. इयत्ता 10वीत शिकणारा विद्यार्थी इंस्टाग्रामवर रिल्स तयार करत होता. यासाठी त्याने एक फास तयार केला होता आणि आपल्या मित्रासोबत मोबाइलवर व्हिडीओ शूट करत होता. हा व्हिडीओ शूट करत असताना अचानक त्याचा खुर्चीवरुन पाय सटकला आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी तयार करण्यात आलेला फास त्याच्या गळ्यात अडकला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी त्याचा लहान भाऊ घरी परतला तेव्हा ही घटना उघडकीस आली. वाचा : सेक्ससाठी नकार दिल्याने पत्नीसोबत क्रूरतेचा कळस, नराधमाने जिवंतपणी दिल्या नरक यातना मित्रांसोबत शूट करत होता व्हिडीओ इंदूर शहरातील हिरा नगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे. येथील 10वीत शिकणारा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत इंस्टाग्रामवर रिल्स तयार कर होता. मृतक हा अल्पवयीन आहे. तो व्हिडीओ करत होता आणि त्याचे मित्र शूट करत होते. यासाठी त्यांनी गाणं लागवलं आणि शूटिंगसाठी एक फास तयार करुन खुर्चीवर उभा राहून गळफास घेण्याची अॅक्टिंग करत होता. त्याच दरम्यान तोल गेला आणि तो खाली कोसळला. यावेळी त्याच्या गळ्यात फास अडकला आणि त्याला गळफास लागला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. वाचा : PUBG च्या नादात भयंकर गुन्हा, अल्पवयीन तरुणाने केला 12 वर्षांच्या भावाचा खून आई-वडील गेले होते लग्नाला ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मृतक विद्यार्थ्याचे आई आणि वडील हे एका लग्नसोहळ्यासाठी बाहेर गेले होते. मृतक मुलगा घरी एकटाच होता. त्यवावेळी त्याने आपल्या घरी इतर मुलांना बोलावून इंस्टाग्राम रिल्स शूट करण्याचं ठरवलं. याच दरम्यान ही दुर्घटना घडली आणि त्याचा मृत्यू झाला. गळफास लागल्याने त्याचे मित्र घाबरले आणि त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. ज्यावेळी मृतक विद्यार्थ्याचा लहान भाऊ घरी परतला तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळावरुन त्याचा मोबाइल जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे. मृतक मुलाचे आई वडील जावरा येथे लग्नासाठी गेले होते. त्यांनी सांगितले की, लग्नासाठी ते जावरा येथे गेले होते. त्यावेळी मुलाने त्यांना कॉल करुन विचारले होते की तुम्ही लग्नाहून घरी कधी परतणार आहात. त्यावर आम्ही एक-दोन दिवसांत परत येऊ असं म्हटलं.
First published:

Tags: Indore, Instagram, Live video, Madhya pradesh

पुढील बातम्या