कोरोना ICU तील आगीचं धक्कादायक CCTV फूटेज; नर्सने कसं वाचवलं रुग्णांना, पाहा VIDEO

कोरोना ICU तील आगीचं धक्कादायक CCTV फूटेज; नर्सने कसं वाचवलं रुग्णांना, पाहा VIDEO

या आयसीयू वॉर्डात कोरोनाचे रुग्ण होते..अनेकांना तर ऑक्सीजन लावले होते, अशा परिस्थितीत अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला

  • Share this:

वडोदरा, 9 सप्टेंबर : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा शहरातील (Vadodara City) सर सयाजीराव जनरल रुग्णालयात काल आग लागल्याची घटना समोर आली होती. या रुग्णालयात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांवरही उपचार सुरू होते. धक्कादायक बाब म्हणजे ही आग कोविड वार्ड आणि आपात्कालीन वार्ड (COVID and emergency ward) मध्ये लागली.  त्या घटनेचे धक्कादायक फूटेज समोर आले आहे. वॉर्डातील सीसीटीव्हमध्ये हे फूटजे कैद झाले आहे.

आग लागल्याचे कळताच सर्वत्र गोंधळ उडाला. याचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. आगीची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झाले आणि त्यांनी आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर ब्रिगेडला (Fire Brigade) बोलावण्यात आले. त्यानंतर काही वेळात त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे.

आगीचे कारण शोधण्यासाठी 4 सदस्यांची कमिटी तयार करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा रुग्णालयाच्या कोरोना वॉर्ड आणि आपात्कालिन वॉर्डमध्ये आग लागली होती.वडोदरामधील कोरोना आयसीयूतील आगीचा धक्कादायक VIDEO समोर आला असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत रुग्णांना पटापट बाहेर काढलं.

हे ही वाचा-वाघालाही घाबरला नाही बैल; गायीचे लचके तोडताना शेजारीच होता उभा, पाहा VIDEO

वेळीच यावर नियंत्रण आणण्यात आल्याने कोरोना रुग्ण सुखरुप आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये नर्सने तातडीने रुग्णांना बाहेर काढले. अनेक रुग्ण ऑक्सीजनवर होते. त्यातही योग्य ती काळजी घेत नर्सने त्यांना सुखरुप बाहेर काढलं.

Published by: Meenal Gangurde
First published: September 9, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या