हृदयद्रावक! लग्नानंतर अवघ्या पाच तासांत नववधूचा मृत्यू; डोली ऐवजी उचलावी लागली तिरडी, पतीने दिला मुखाग्नी

हृदयद्रावक! लग्नानंतर अवघ्या पाच तासांत नववधूचा मृत्यू; डोली ऐवजी उचलावी लागली तिरडी, पतीने दिला मुखाग्नी

जिच्यासोबत आयुष्य घालवण्याचा निर्धार केला तिला घरी नेण्याआधीच मुखाग्नी देण्याचं दुर्दैव नवरदेवावर आलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे: लग्न (wedding) म्हणजे दोन जीवांचं आणि कुटुंबीयांचं मिलन. प्रत्येकानं लग्नासाठी स्वप्न पाहिली असतात. मात्र, लग्नाच्याच दिवशी नवरीला मुखाग्नी द्यावा लागला तर.... अशी दुर्दैवी वेळ एका नवरदेवावर ओढवली आहे. लग्नानंतर अवघ्या 5 तासांत या नवरदेवावर त्याच्या नववधूला मुखाग्नी (last rites) देण्याची वेळ आली. ही धक्कादायक घटना बिहारच्या मुंगेर (munger district of Bihar) जिल्ह्यात घडली आहे. जिच्यासोबत आयुष्य घालवण्याचा निर्धार केला  तिला घरी नेण्याआधीच मुखाग्नी (funeral) देण्याचं दुर्दैव नवरदेवावर आलं.

अफजल नगर पंचायती अंतर्गत खुदिया गावात ही धक्कादायक घटना घडली. रंजन यादव यांची मुलगी निशा कुमारीचं (Nisha Kumari) लग्न होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. पाहुणे आले होते आणि लग्नघरात आनंदाचं वातावरण होतं. 8 मे रोजी ठरलेल्या मुहुर्तावर महकोला गावातील सुरेश यादव यांचा मुलगा रविश वरातीसह लग्नघरी पोहोचला. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे नियमांनुसार (corona wedding protocols) कुटुंबीयांसह मोजकेच नातेवाईक लग्नाला उपस्थित होते. परंपरेनुसार लग्नातील सर्व विधी पार पडत होत्या. नवरदेव नवरीने सात फेरे घेतले. नवरदेवाने नवरीच्या भाळी कुंकू भरलं आणि अचानक तिची तब्येत बिघडली. नवभारत टाईम्सने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

वाचा: चिंता वाढली! कोरोनानंतर आता मुंबईत म्युकर मायकोसिसची भीती; रुग्णालयात आढळले तब्बल 111 रुग्ण

घाबरलेल्या कुटुंबियांनी निशाला तारापूरच्या (Tarapur) प्राथमिक आरोग्य केंद्रात नववधूला उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी तिला तपासलं मात्र, निशाची तब्येत जास्त बिघडली असल्यानं त्यांनी तिला भागलपूरला (Bhagalpur) रेफर केलं. भागलपूरमध्ये उपचार सुरू असतानाच नववधूच्या रुपात सजलेल्या अवस्थेत निशानं अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळं उत्साह आणि आनंद भरलेल्या लग्नघरात अचानक स्मशानशांतता पसरली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळ्यात वाईट अवस्था तर नवरदेव रविशची झाली होती. अगदी काही वेळापूर्वी आयुष्यभर साथ देण्याच्या निर्धार केलेली निशा काही तासांतच त्याला एकटं सोडून निघून गेली होती. जो रविश निशाला लग्नानंतर सासरी घेऊन जाणार होता, त्याच्यावर तिला मुखाग्नि देण्यासाठी स्मशानात (Cemetery) नेण्याची वेळ आली.

निशाच्या अचानक मृत्यूमुळे हतबल झालेल्या रविशनं सुल्तानगंज स्मशानभूमित पारंपारिक पद्धतीनुसार निशावर अंत्यसंस्कार (groom performed last rites) केले. या धक्कादायक घटनेमुळे कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशी वेळ आयुष्यात आपल्या शत्रूवरही येऊ नये असंच प्रत्येकाला वाटतं. निशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

First published: May 12, 2021, 6:22 PM IST

ताज्या बातम्या