धक्कादायक! पाटन्यात बॉम्बस्फोट, अनेक जखमी

धक्कादायक! पाटन्यात बॉम्बस्फोट, अनेक जखमी

ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथे भाडेकरू राहत होता

  • Share this:

पाटना, 10 फेब्रुवारी : आज सकाळी पाटना येथे बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना गांधी मैदान पोलीस स्टेशन परिसरातील दलदली रस्त्यावर घडली. येथील एका घरात स्फोट झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट घरात ठेवलेल्या बॉम्बमध्ये झाला आहे.

स्फोट इतका जोरदार होता की, यामुळे दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्या घरात राहणारे बरेच लोक जखमी झाले आहेत. एकापाठोपाठ दोन जोरात स्फोट झाले असून या स्फोटात पाच लोक जखमी झाले आहेत. त्यांना पीएमसीएच येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असे स्थानिक लोकांनी सांगितले. या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. बॉम्बस्फोटामुळे खोलीची भिंत पडली होती. खोलीचा दरवाजादेखील तुटला आहे. आजूबाजूच्या परिसरातील घरांच्या खिडक्यांनाही तडे गेले आहेत. पोलिसांनी प्रथमदर्शनी हा बॉम्बस्फोट असल्याचे सांगितले आहे, तसेच एफएसएलची टीम आगमनानंतरच काही तपशीलवार सांगितले जाणार आहे. स्फोट होताच या भागात गोंधळ उडाला आणि लोक इकडे-तिकडे पळू लागले.

घटनास्थळी घरमालकाने सांगितले की, ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथे भाडेकरू राहत होते आणि ते ऑटो चालवत असत. भाडेकरू गेल्या तीन महिन्यांपासून घरात राहत होता परंतु घरमालकाला  भाडेकरूची संपूर्ण माहिती देता येऊ शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2020 10:05 AM IST

ताज्या बातम्या