धक्कादायक! देशात अवघ्या 6 दिवसांत 1 लाख कोरोना रुग्णांची वाढ

धक्कादायक! देशात अवघ्या 6 दिवसांत 1 लाख कोरोना रुग्णांची वाढ

देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जुलै : देशात कोरोना व्हायरसची 27,114 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. यासह शनिवारी देशात संक्रमणाची एकूण संख्या आठ लाखांच्या पलीकडे गेली आहे. तर फक्त चार दिवसांपूर्वीच देशात कोविड – 19 च्या रुग्णांनी सात लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात संसर्ग होण्याची एकूण प्रकरणे 8,20,916 पर्यंत वाढली आहेत. त्याचबरोबर, कोविड – 19 मुळे 519 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 22123 पर्यंत पोहोचला आहे.

हे वाचा-कोरोना महासाथीतील धक्कादायक अहवाल; देशातील 62 टक्के मुलांचं शिक्षण थांबलं

सलग आठवा दिवस आहे जेव्हा देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 22,000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आता कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. देशात संसर्गाची पहिली एक लाख प्रकरणे असून 110 दिवसांपर्यंत आले होते. ही संख्या आठ लाखांवर पोचण्यासाठी केवळ 53 दिवस लागले आहेत.  3 जून रोजी देशातील कोविड – 19 मधील रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त होती, तर 3 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 दिवस लागले आणि 8 दिवसांनंतर 21 जून रोजी संक्रमितांची संख्या 4 लाखांहून अधिक झाली.

यानंतर, पुढील एक लाख प्रकरणे अवघ्या सहा दिवसांत समोर आली आणि त्यातून पाच लाखांचा टप्पा ओलांडला. सात लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 दिवस लागले.

Published by: Meenal Gangurde
First published: July 11, 2020, 9:09 PM IST

ताज्या बातम्या