धक्कादायक! अयोध्येत भरदिवसा गोळीबार, BJP नेत्यासह दोघांची हत्या

धक्कादायक! अयोध्येत भरदिवसा गोळीबार, BJP नेत्यासह दोघांची हत्या

आधीच कोरोनाचा धोका त्यात या गोळीबारामुळे अयोध्येतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • Share this:

अयोध्या, 18 मे : कोरोनासारख्या (Coronavirus) महाभंयकर आजाराचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. यादरम्यान अयोध्यामध्ये सोमवारी पलिया प्रताप शाह गावात ग्राम प्रधान जय प्रकाश सिंह आणि राम पदारथ यादव उर्फ नन्हा यादव यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या संघर्षात दोघांनीही एकमेकांना गोळी घातली. ज्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. सूचना मिळताच एसएसपी आशिष तिवारीसह मोठ्या संख्येने पोलीस दल घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

सांगितले जात आहे की, मृतक जयप्रकाश सिंह हे भाजप खासदार लल्लू सिंह यांच्या जवळचे होते. घटनेबाबत माहिती मिळताच लल्लू सिंहदेखील घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे परिसरात खळबळ झाली आहे. येथे मोठ्या संख्येने पोलीस दल उपस्थित आहे.

येथे गोळीबार झाल्यानंतर जखमी झालेल्या जयप्रकाश सिंह यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. दोघामध्ये पूर्वीपासून संघर्ष होता. सध्या पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

अयोध्यात गोळीबाराची दुसरी घटना घडली. यात महराजगंज भागात दोन दिवसांपूर्वी मंशाराम यादव यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आणि मृतदेह रेतीमध्ये लपवून ठेवला. आज पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. सध्या देशभरात कोरोनासारखा महाभयंकर आजार बळावत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात अयोध्येत झालेल्या या गोळीबारामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे.

संबंधित -CBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, असे होणार पेपर

...तोपर्यंत वेश्या व्यवसाय बंद करा, संशोधकांचा केंद्र सरकारला सल्ला

First published: May 18, 2020, 2:48 PM IST

ताज्या बातम्या