धक्कादायक! स्टाफला फसवून विमानात केलं पॉर्न फिल्मचं शूटिंग

धक्कादायक! स्टाफला फसवून विमानात केलं पॉर्न फिल्मचं शूटिंग

स्टाफला फसवून पॉर्न फिल्म शूट केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर कोणावर कारवाई होणार याकडे लक्ष आहे.

  • Share this:

मिसलँड, 17 नोव्हेंबर: स्टाफला धोका देऊन काही अभिनेत्रींनी म्युझियममधील विमानात पॉर्न फिल्म तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्युझियममधील विमानात सिनेमाचं शूटिंग करायचं आहे असं सांगून या अभिनेत्रींनी 9000 रुपये दिवसाचं भाडंही दिलं. स्टाफला खोटं सांगून या अभिनेत्रींनी म्युझियममधील विमानात पॉर्न फिल्म शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पॉर्न फिल्म शूट करत असल्याची पूर्वकल्पना या अभिनेत्रींनी स्टाफला दिली नव्हती. त्यामुळे ही बाब समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे.

ब्रिटनमधील मिडलँड म्युझियम पाहण्यासाठी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच नागरिक येत असतात. तसंच परदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या सगळ्यामध्ये एडल्ट फिल्मच्या शूटिंगवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. द सन या वृत्तपत्रानं दिलेल्या अहवालानुसार ज्या विमानात अडल्ट सिनेमा शूट केला जात होता ते विमान एकेकाळी फ्रान्सचं असल्याची माहिती समोर आली आहे. ''आमच्या डोळ्यात धुळफेक केली असून खोटं बोलून अशा प्रकारचा सिनेमा शूट करण्यात आल्याचा आरोपी म्युझियममधील स्टाफने केला आहे. अडल्ट फिल्म या विमानात चित्रित केली जाणार आहे. याची कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला देण्यात आली नव्हती. अभिनेत्रींनी फक्त Vickers Viscount विमानात स्विमवियर सिनेमा शूट करण्यासाठी आले असल्याचं सांगितलं होतं'' असा आरोपही तिथल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. अशा प्रकारचं शूटिंग केलं जाणार आहे याची पूर्व कल्पना असती तर आम्ही म्युझियममध्ये शुटिंगला परवानगीच दिली नसती असंही तिथले कर्मचारी म्हणाले. किंवा असं काही सुरू आहे याची जराही पुसटशी कल्पना आली असती तरी शूटिंग थांबलं असतं. असंही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. ज्या विमानात अडल्ट फिल्मचं शूटिंग सुरू होतं. त्या विमानाचा वापर 1950 साली चार्टर हॉलिडेसाठी करण्यात आला होता.

या अभिनेत्रींनी शूटिंगसाठी पायलटचे कपडे घातले होते. काही अभिनेत्री या एअरहॉस्टेसचे कपडे घातले होते. अशाप्रकारे पोशाख करून अनेक जण इथे शूटिंगच्या निमित्तानं येत असतात. त्यामुळे कुणाच्याच मनात असं काही होईल याबाबत साधी शंकेची पालची चुकचुकली नाही असं स्पष्टीकरण म्युझियमचे मॅनेजर डिआने जेम्स यांनी दिलं आहे. याप्रकऱणी अभिनेत्रींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Published by: Kranti Kanetkar
First published: November 17, 2019, 1:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading