मराठी बातम्या /बातम्या /देश /

Shocking! 5 वर्षांपासून दबलेल्या बॉम्बने घेतला जवानाचा जीव; थंडीसाठी पेटवली शेकोटी, मात्र झाला ब्लास्ट...

Shocking! 5 वर्षांपासून दबलेल्या बॉम्बने घेतला जवानाचा जीव; थंडीसाठी पेटवली शेकोटी, मात्र झाला ब्लास्ट...

या दुर्घटनेत एका जवानाचा मृत्यू झाला असून बाकी 8 जणं गंभीर जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेत एका जवानाचा मृत्यू झाला असून बाकी 8 जणं गंभीर जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेत एका जवानाचा मृत्यू झाला असून बाकी 8 जणं गंभीर जखमी झाले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

जेसलमेर, 20 डिसेंबर : राजस्थानातील (Rajasthan News) जेसलमेर स्थित भारत-पाकिस्तान आतंरराष्ट्रीय सीमेवर ( India-Pakistan International Border) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे भारतीय सैन्यातील जेसलमेर जिल्ह्यातील किशनगड फील्ड फायरिंग रेंज (Kishangarh Field Firing Range) मध्ये रविवारी एक दुर्घटना घडली. येथे एका मोटारीच्या गोळ्याचा स्फोट (Mortar shell exploded) झाल्याने जवानाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या दुर्घटनेत 8 अन्य जवान जखमी झाले आहेत.

धनबाद निवासी बीएसएफचे जवान संदीप सिंहचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत झारखंडमधील धनबाद निवासी बीएसएफचे जवान संदीप सिंह यांचा मृत्यू झाला. तर अनेक जवान जखमी झाले. अचानक जोरदार स्फोट झाल्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. यानंतर तातडीने जखमींना उपचारासाठी जवळील रामगडमधील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र बीएसएफच्या 136 व्या वाहिनीती जवान संदीप कुमार सिंह यांना वाचवण्यात आलं नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, किशनगड फायरिंज रेंज भारत-पाक बॉर्डरवर तनोतच्या जवळ स्थित आहेत. येथे सातत्याने अभ्यास सुरू आहे. रविवारी बीएसएफचे जवान नियमितपणे अभ्यास करीत होते. यादरम्यान सकाळी सकाळी ही दुर्घटना घडली. थंडीपासून बचाव करण्यासाठी येथे बीएसएफच्या जवानांनी शेकोटी पेटवली होती. यादरम्यान हा ब्लास्ट झाला.

हे ही वाचा-काळ आला होता पण वेळ नाही, आरपीएफ जवानाने महिलेला शिताफीने वाचवलं, थरारक VIDEO

काही बॉम्बचा ब्लास्ट होत नाही तर जमिनीत दबललेल्या अवस्थएत असतात. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षात येथे स्क्रेप बीन करण्यात आली नाही. त्यामुळे हे बॉम्ब माइंन्सचं काम करतात.

 

First published:

Tags: Bomb Blast, Indian army, Rajasthan