धक्कादायक, अपहरण केलेल्या पोलीस जवानांनी माओवाद्यांनी केली हत्या, मृतदेह...

धक्कादायक, अपहरण केलेल्या पोलीस जवानांनी माओवाद्यांनी केली हत्या, मृतदेह...

मल्लुराम सुर्यवंशी असं या पोलीस जवानाने नाव आहे. माओवादीविरोधी अभियानात मल्लुराम सुर्यवंशी हे तैनात होते.

  • Share this:

छत्तीसगड, 18 सप्टेंबर : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी गेल्या का ही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. माओवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलीस जवानांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर माओवाद्यांनी पोलीस जवानाचा मृतदेह महामार्गावर फेकून दिला.

मल्लुराम सुर्यवंशी असं या पोलीस जवानाने नाव आहे.  माओवादीविरोधी अभियानात मल्लुराम सुर्यवंशी हे तैनात होते. माओवाद्यांनी पाच दिवसांपूर्वी  सुर्यवंशी यांचे अपहरण केले होते.

पाच दिवस माओवाद्यांनी सुर्यवंशी यांना आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न केला. पण कोणतेही यश आले नाही. गुरुवारी मध्यरात्री माओवाद्यांनी गोळ्या घाडून सुर्यवंशी यांची हत्या केली.

मल्लुराम सुर्यवंशी यांची हत्या केल्यानंतर माओवाद्यांनी त्यांचा मृतदेह हा  बिजापूर गंगलुर रस्त्यावर पदेडा गावाजवळ फेकून दिला. त्यांचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. त्यानंतर ओळख पटल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, मागील आठवड्यात बिजापूर (Bijapur) जिल्ह्यात मेटपाल आणि पुसनार गावातून 26 नागरिकांचे माओवाद्यांनी अपहरण केल होते. यात चौघांची हत्या केली असून 16 नागरिक अजूनही माओवाद्यांच्या ताब्यात आहेत.

दंतेवाडा जिल्ह्यात मागील गुरुवारी माओवाद्यांनी दोन जणांची हत्या केली होती. तसंच बिजापूर येथील कुटरू येथून एएसआय (ASI) नागैय्या कोरसा यांची माओवाद्यांनी हत्या केली. माओवाद्यांनी गावातून कोरसा यांचं अपहरण केले होते. कोरसा हे पोलीस स्टेशनमधून सुट्टी घेऊन घरी गेले होते, त्यानंतर माओवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं. माओवाद्यांनी कोरसा यांची हत्या करून मृतदेह हा रस्त्यावर फेकून दिला होता.

त्यानंतर बिजापूर जिल्ह्यात जनअदालत भरवून माओवाद्यांनी ठार केलेल्या चार आदिवासी नागरिकांचे मृतदेह जवानांनी तब्बल वीस किलोमीटरचा पायी प्रवास करून सुरक्षित पोहोचले. विशेष म्हणजे, यावेळी जवानांना तुडुंब वाहणारी नदी पार करून यावं लागलं होतं.

Published by: sachin Salve
First published: September 18, 2020, 10:04 AM IST

ताज्या बातम्या