VIDEO : मारा आणि खून करा, पण रडत बसू का - कुलगुरूंची विद्यार्थ्यांसमोर मुक्ताफळं

VIDEO : मारा आणि खून करा, पण रडत बसू का - कुलगुरूंची विद्यार्थ्यांसमोर मुक्ताफळं

यादव हे एवढाच उपदेश करून थांबले नाहीत तर खून करून माझ्याकडे या मी पुढच्या गोष्टी बघून घेतो अशीही मुक्ताफळं त्यांनी उधळलीत.

  • Share this:

लखनऊ 30 डिसेंबर : "कुणाशी भांडण झालं तर रडत परत येवू नका. पहिले त्याला मारझोड करा आणि शक्य असेल तर त्याचा खून करा आणि नंतरच माझ्याकडे या" ही वाक्य कुणा गुंडाची किंवा दादाची नाहीत तर  हे भाषण आहे एका कुलगुरूचं. उत्तर प्रदेशातल्या पुर्वांचल विद्यापीठाचे कुलगुरू राजाराम यादव यांनी विद्यार्थ्यांसमोर बोलताना ही मुक्ताफळं उधळली.


शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, चार उपदेशाच्या गोष्टी सांगाव्यात. चांगलं शिकवणं होत नसेल तर किमान वाईट उपदेश देऊ नये असं म्हटलं जातं. पण एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनीच अशी मुक्ताफळं उधळली असतील तर काय करायचं असा प्रश्न आता विचारला जातोय.


पुर्वांचल विद्यापीठात एका सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे विद्यार्थ्यांची संख्याही मोठी होती. कुलगुरूंनीच असं विधान केल्यानं शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. यादव हे एवढाच उपदेश करून थांबले नाहीत तर खून करून माझ्याकडे या मी पुढच्या गोष्टी बघून घेतो अशीही मुक्ताफळं त्यांनी उधळलीत.


यादव यांच्या भाषणांवर चौफेर टीका होत असून सोशल मीडियावरही त्यांचं हे भाषण व्हायरल होत आहे. शिक्षकांनी दिशा देण्याचे साडून मुलांना दिशाहीन करण्याचे हे उद्योग असल्याची टीका तरूणांनी केलीय. अशा कुलगुरूला क्षणभरही पदावर ठेवू नका अशी मागणीही तरूणांनी सरकारकडे केली आहे.


 


 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2018 07:52 PM IST

ताज्या बातम्या