मराठी बातम्या /बातम्या /देश /

''कधीही न भरुन येणारी पोकळी...'', पंतप्रधानांनी वाहिली बाबासाहेब पुरंदरेंना भावनिक श्रद्धांजली

''कधीही न भरुन येणारी पोकळी...'', पंतप्रधानांनी वाहिली बाबासाहेब पुरंदरेंना भावनिक श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट केला आहे.

    नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचं आज वयाच्या 100 व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ट्विटरवरून (Twitter) श्रद्धांजली (Tribute) वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट केला आहे. तसंच या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. मोदींना या ट्विट सोबत आणखी एक ट्विट केलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं की, पुरंदरे यांचे कार्य सदैव स्मरणात राहील आणि त्यांच्या कार्यातून ते जीवंत असतील. बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. काय म्हणाले पंतप्रधान मोदी शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी शब्दांच्या पलीकडे दुखत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (shivshahir babasaheb purandare) यांचं निधन झालं आहे. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आज एका इतिहास पूत्र मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता, त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली. पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. हेही वाचा- द्रविडच्या मुलानं केलेल्या फोनमुळे 'द वॉल' बनला हेड कोच! गांगुलीनं सांगितला 'तो' किस्सा बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. तरुणपणापासून ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1761’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. हेही वाचा- अजित पवार पहाटे पोहोचले पंढपुरात, कार्तिकी एकादशीनिमित्त केली महापूजा बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन आणि जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना 2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षांत 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Pm modi

    पुढील बातम्या