गुजरातमध्ये 50 जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार

गुजरातमध्ये 50 जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार

2012 साली शिवसेनेने गुजरातमध्ये एकाही जागेवर निवडणूक लढवली नव्हती. हिंदु मतांचं विभाजन व्हायला नको म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं होतं.पण यावर्षी शिवसेना भाजपविरूद्ध निवडणूक लढवणार आहे. तसंच या निवडणुकीत शिवसेना हार्दिक पटेलला पाठिंबा देणार असल्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे

  • Share this:

अहमदाबाद,09 नोव्हेंबर: शिवसेना गुजरातमध्ये 50हून अधिक विधानसभेच्या जागा लढवणार आहे. यासंदर्भात आज संध्याकाळी 4 वाजता शिवसेना सचिव आणि खासदार अनील देसाई अहमदाबादमधे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करणार आहेत.

2012 साली शिवसेनेने गुजरातमध्ये एकाही जागेवर निवडणूक लढवली नव्हती. हिंदु मतांचं विभाजन व्हायला नको म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं होतं.पण यावर्षी शिवसेना भाजपविरूद्ध निवडणूक लढवणार आहे. तसंच या निवडणुकीत शिवसेना हार्दिक पटेलला पाठिंबा देणार असल्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे शिवसनेनी या निवडणुकीत उडी घेतल्यामुळे गुजरातच्या निवडणुका अधिकच महत्त्वाच्या ठरत आहे. यंदाच्या गुजरात निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोघंही जोरदार प्रचार करत आहेत. तसंच पाटीदार आंदोलनही या निवडणुकीत एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो आहे.

गुजरातमध्ये दोन चरणात मतदान होणार असून 18 डिसेंबरला निकाल लागणार आहे.

First published: November 9, 2017, 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading