Home /News /national /

बिहारच्या निवडणूक आखाड्यात शिवसेना उतरणार, 30 ते 40 जागा लढण्याचे राऊतांचे संकेत

बिहारच्या निवडणूक आखाड्यात शिवसेना उतरणार, 30 ते 40 जागा लढण्याचे राऊतांचे संकेत

kunal kamra invites sanjay raut on his podcast

kunal kamra invites sanjay raut on his podcast

यावेळी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा तापलेला असल्याने शिवसेनेच्या निवडणूक लढविण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

    मुंबई 06 ऑक्टोबर: बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात (Bihar Assembly Election 2020) उतरण्याचा निर्णय शिवसेनेने (Shiv sena) घेतला आहे. खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी याची घोषणा केली. शिवसेना बिहारमध्ये 30 ते 40 जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. स्थानिक नेते हे 50 जागांवर निवडणूक लढवावी या मताचे आहेत असंही त्यांनी सांगितले. निवडणुकीत प्रसाचारासाठी जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय (Gupteshwat Pandey) यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार का? यावर बिहारमध्ये गेल्यानंतरच बोलणार असल्याचंही ते म्हणाले. बिहारमध्ये शिवसेनेची फारशी ताकद नाही. यावेळी सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा तापलेला असल्याने शिवसेनेच्या निवडणूक लढविण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. बिहारमध्ये आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA निवडणूक लढवत आहे. तर राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांची आघाडी आहे. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हाथरसमध्ये आणखी एक घृणास्पद घटना! 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; चिमुरडीचा मृत्यू बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांचं नेतृत्व मान्य नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार नसल्याचं पक्षाने ठरविल्याची माहिती. चिराग पासवान यांनी दिला आहे.  चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 15 ऑक्टोबरपासून उघडणार सिनेमागृहं, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी LJP हा NDAमधून बाहेर पडला तरीही त्या पक्षाने भाजपची साथ सोडलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपशी संबंध कायम राहणार असल्याचं पासवान यांच्यावतीने सांगण्यात आलं आहे. पासवान यांनी राज्यात भाजप आणि लोकजनशक्तीचं सरकार आणू असंही म्हटलं आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून जेडीयू आणि पासवान यांच्या पक्षात मतभेद झाल्याने पासवान यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यात जास्त जागांची मागणी केली होती. तर नितिश कुमार हे तेवढ्या जागा सोडायला तयार नव्हते. त्यामुळे पासवान यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sanjay Raut (Politician)

    पुढील बातम्या