मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या चंद्राबाबूंना शिवसेनेची साथ

पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या चंद्राबाबूंना शिवसेनेची साथ

आंध्र प्रदेशच्या स्वाभीमानासाठी हे उपोषण असल्याचं चंद्रबाबूंनी सांगितलं आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

आंध्र प्रदेशच्या स्वाभीमानासाठी हे उपोषण असल्याचं चंद्रबाबूंनी सांगितलं आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

आंध्र प्रदेशच्या स्वाभीमानासाठी हे उपोषण असल्याचं चंद्रबाबूंनी सांगितलं आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

नवी दिल्ली 11 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका करणाऱ्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्यातल्या आरोप-प्रत्यारोपांनी आता टोक गाठलंय. आंध्राला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी चंद्राबाबूंनी सोमवारी नवी दिल्लीत उपोषण केलं. या उपोषणाच्या निमित्त पुन्हा एकदा विरोधीपक्षांची एकजुट बघायला मिळाली. आंध्र प्रदेशच्या स्वाभीमानासाठी हे उपोषण असल्याचं चंद्रबाबूंनी सांगितलं आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

आज सकाळपासून चंद्राबाबू आंध्र भवनमध्ये उपोषणाला बसले आहेत. लखनऊला जायच्या आधी राहुल गांधी यांनी चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. फारुख अब्दुल्ला, शरद पवार, अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनीही चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलाय. भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेनेही पाठिंबा दिला. खासदार संजय राऊत यांनी आंध्र भवनात जाऊन चंद्राबाबूंची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथही सोबत होते.

रविवारी नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातल्या गुंटूर इथं सभा घेऊन चंद्राबाबूंवर टीका केली होती. चंद्रबाबू हे राज्यांच्या नाही तर आपला मुलगा लोकेशच्या भल्यासाठी काम करत असल्याची टीका त्यांनी केली होती. तर चंद्राबाबू यांनी पंतप्रधानांना धमकी देत मुलावर टीका करण्याचं बंद करा नाही तर तुमच्या पत्नीचा उल्लेख प्रचारात करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

त्यामुळे प्रचार वयक्तिक पातळीवर गेल्याचा आरोपही होतोय. राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुनच चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडले होते. तर असा दर्जा देणं घटनात्मदृष्ट्या शक्य नाही असं केंद्र सरकारचा युक्तिवाद आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हा सामना आणखी रंगण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Andhra Pradesh CM, N Chandrababu Naidu, Narendra modi, NDA, आंध्र प्रदेश, चंद्राबाबू नायडू, नरेंद्र मोदी