मराठी बातम्या /बातम्या /देश /

'दिदी बंगाली वाघिण...', बंगालमध्ये निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊतांनी केली ही घोषणा

'दिदी बंगाली वाघिण...', बंगालमध्ये निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊतांनी केली ही घोषणा

West Bengal Assembly Election 2021: शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही असा प्रश्न गेले काही दिवस उपस्थित केला जात होता. दरम्यान या प्रश्नावर आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट केल्यानंतर या संदर्भातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 04 मार्च: शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election 2021) लढवणार की नाही असा प्रश्न गेले काही दिवस उपस्थित केला जात होता. दरम्यान या प्रश्नावर आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट केल्यानंतर या संदर्भातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय घेण्यात आला असल्याचं राऊत म्हणाले. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'ममता बॅनर्जी बंगालची खऱ्या वाघ आहेत. त्यामुळे शिवसेना निवडणूक न लढवता ममता दिदींना पाठिंबा देणार आहे.'

गेले काही दिवस अनुत्तरित असणाऱ्या प्रश्नाला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीबाबत संजय राऊत यांनी शिवसनेनेचा निर्णय ट्वीट केला आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'अनेकजणं हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, पश्चिम बंगालमधील निवडणूक शिवसेना लढवणार की नाही? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करून त्याबाबतीत हे अपडेट देत आहोत.'

(हे वाचा-मुस्लीम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे अबू आझमी संतापले)

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, 'सध्याची परिस्थिती पाहता 'दिदी विरुद्ध सर्व' अशी लढाई आहे. सर्व M- मनी, मसल आणि मीडिया 'M'amata यांच्या विरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे शिवसेनेने निवडणूक न लढवण्याचा आणि खंबीरपणे त्यांच्या (ममता बॅनर्जी) पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांना 'Roaring' यशासाठी शुभेच्छा देतो, कारण आमचा असा विश्वास आहे की त्याच बंगाली वाघिण आहेत.'

First published:

Tags: BJP, Mamata banerjee, PM narendra modi, Sanjay raut, Uddhav thackeray, West bengal