दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्यांच्या सवलती बंद करा, शिवसेना खासदाराचा प्रस्ताव

दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्यांच्या सवलती बंद करा, शिवसेना खासदाराचा प्रस्ताव

'याचं स्वागत करायला पाहिजे. मात्र याला धार्मिक रंग दिला जाऊ नये. लोक शिकले, सवरले की ते आपोआपच असे निर्णय घेतात. त्यामुळे सगळ्यांना शिक्षण कसं मिळेल तेही पाहिलं पाहिजे'

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी मांडलेल्या प्रस्तावावर नवी चर्चा सुरु झालीय. ज्या नागरिकांना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या सवलती बंद करा असा हा प्रस्ताव असून खासदार देसाई यांनी राज्यसभेत खासगी विधेयकाद्वारे हा प्रस्ताव मांडलाय. लोकसंख्येवर नियंत्रण असावं यासाठीच हा प्रस्ताव असल्याचं मत अनिल देसाई यांनी व्यक्त केलं. तर यासाठी जबदस्ती करू नये लोकांना विश्वासात घेऊन असा कायदा केला गेला तर त्याला विरोध असणार नाही असं मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलंय.

खासदार अनिल देसाई यांनी प्रत्येक कुटुंबातील दोन मुलांची संख्या मर्यादित करण्यासाठी प्रोत्साहनपर प्रस्ताव आणण्याच्या प्रस्तावाचे खासगी  विधेयक राज्यसभेत मांडले आहे.

यासंदर्भात देसाई यांनी भारतीय राज्यघटनेत कलम ४७ अ अशी नवीन तरतूद सुधारित करण्यात यावी अशी सूचना या विधेयकात करण्यात आली आहे.

अहमदाबादला स्वागताला येतील 7 लाख लोक, भारत भेटीबद्दल भरभरून बोलले डोनाल्ड ट्रम्प

ज्यांना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत त्यांना कर आणि शिक्षणासह इतर ठिकाणी मिळणाऱ्या सवलती बंद कराव्यत असं त्यांनी लोकसख्या नियंत्रणासाठी आणलेल्या खासगी विधेयकात म्हटलं आहे.

सध्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

VIDEO: माथेफिरू प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई म्हणाले, हा सामाजिक मुद्दा आहे. याचं स्वागत करायला पाहिजे. मात्र याला धार्मिक रंग दिला जाऊ नये. लोक शिकले, सवरले की ते आपोआपच असे निर्णय घेतात. त्यामुळे सगळ्यांना शिक्षण कसं मिळेल तेही पाहिलं पाहिजे असंही ते म्हणाले.

 

First published: February 12, 2020, 10:37 AM IST
Tags: Population

ताज्या बातम्या