'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'

'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'

'राम मंदिराचं शिवसेनेने श्रेय घेणं म्हणजे रामसेतू बांधतांना खारीचा वाटा उचलण्यासारखं आहे. सर्वच पक्षांनी या आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे'

  • Share this:

सागर कुलकर्णी, भोपाळ, ता.20 नोव्हेंबर : शिवसेना राम मंदिराच्या प्रश्नावरून आक्रमक झालेली असताना भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी सेनेला टोला लगावलाय. राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त खारीचा वाटा आहे असं मत त्यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना व्यक्त केलं.

विजयवर्गीय म्हणाले, राम मंदिराचं शिवसेनेने श्रेय घेणं म्हणजे रामसेतू बांधतांना खारीचा वाटा उचलण्यासारखं आहे. सर्वच पक्षांनी या आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे असंही ते म्हणाले. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर जास्त बोलण्याचं टाळलं. भगवान राम हे सर्वांचे आहेत त्यामुळं अयोध्येत कुणीही येवू शकतो अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. ते तिथे जाहीर सभा घेणार आहेत, तर त्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेनेही अयोध्येत धर्मसभेचं आयोजन केलंय. ही सभा शिवसेनेपेक्षाही मोठी व्हावी यासाठी संघ परिवाराने आपली पूर्ण शक्ती पणाला लावलीय.

राम मंदिर बांधणं होत नसेल तर सांगा, आम्ही बांधतो असं थेट आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला आणि भाजपला कोंडीत पकडलं. अयोध्येत शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. शिवसेना आणि भाजपचे संबंध सध्या ताणलेले असल्यानं शिवसेनेची ही कृती म्हणजे भाजपला आव्हान समजलं जातं.

याला उत्तर देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं त्याच दिवशी अयोध्येत धर्मसभेचं आयोजन केलंय. त्यासाठी जोरदार वातावरण निर्मिती उत्तरप्रदेशात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि अभाविप या संघपरिवारातल्या सर्व संघटना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झटत आहेत.

 

 

विहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ

First published: November 20, 2018, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading