'राफेल'मध्ये भ्रष्टाचार नाही तर चौकशीला का घाबरता? शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'राफेल'मध्ये भ्रष्टाचार नाही तर चौकशीला का घाबरता? शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'लोकांच्या मनात संशय कायम आहे. तो संशय दूर झाला पाहिजे.'

  • Share this:

नवी दिल्ली  2 जानेवारी : राफेल प्रकरणावर झालेल्या चर्चेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. जर घोटाळा झालाच नाही तर चौकशी का करत नाही असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारला केला. त्यामुळे राफेलच्या मुद्यावर शिवसेना विरोधीपक्षांसोबत असल्याचं चित्र स्पष्ट झालं.

आपल्या भाषणात अरविंद सावंत म्हणाले, "या प्रकरणात सरकारी कंपनीला डावलण्यात आलं. ज्या कंपनीला कामाचा काहीही अनुभव नाही त्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं. अरुण जेटलींचं भाषण मी ऐकलं, परंतू त्याने समाधान झालं नाही. लोकांच्या मनात संशय कायम आहे. तो संशय दूर झाला पाहिजे."

राफेलवरच्या चर्चेरम्यान भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये चांगलाच संघर्ष झाला. राहुल गांधी बोलत असताना भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांना एकदा सभागृह तहकूबही करावं लगाली. तर सरकारच्या वतीने उत्तर देताना अरुण जेटलींच्या भाषणादरम्यान काँग्रेसच्या खासदारांनी कागदी विमान त्यांच्या अंगावर भिरकावली. अध्यक्षांनी काँग्रेस खासदारांच्या या कृतीवर आक्षेप घेतला. शेवटी त्यांना सभागृह तहकूब करावं लागलं.

शब्दांचे बाण

चर्चेत दोन्ही बाजूंचे नेते बोलत असताना घोषणाबाजीही सुरू होती. काँग्रेसचे सदस्य पंतप्रधान चौर है, चौकिदार चौर हे, अशा घोषणा देत होते तर भाजपचे सदस्य, राहुल का पुरा खानदान चौर है अशा घोषणांनी त्यांना प्रत्युत्तर देत होते.

काय म्हणाले राहुल गांधी?

राफेल प्रकरणावर सर्व देश पंतप्रधानांच्या भूमीकेवर संशय व्यक्त करतोय. त्यांनी एकाही प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नाही.

पंतप्रधानां सर्वांसमोर येवून बोलण्याची हिंम्मत नाही.

राफेलचा जुना करार बदलून नवा करार का करण्यात आला. फक्त 36 विमानं खरेदी करण्याचा करार का करण्यात आला?

राफेलच्या किंमती का वाढल्या. काही कंपन्यांनाच का निवडलं या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागतील.

राहुल गांधींना जेटलींचं उत्तर

- या देशातल्या काही घराण्यांना फक्त पैशाचं गणित कळतं.

- काँग्रेसला देशाच्या सुरक्षेशी काहीही देणं घेणं नाही.

- कारगील युद्धाच्यावेळी देशाच्या लष्कराजवळ पुरेशी शस्त्र नव्हती.

- युपीए सरकाने देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड केली.

- 15 वर्षांपूर्वी राफेलचा करार केला होता. पण काहीही झालं नाही.

- देशाला ही निर्णय प्रक्रिया परवडणारी नाही.

- बोफोर्स प्रकरणातही अनेक नावं आली होती. ती पुन्हा घ्यायची का?

- सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतरही काँग्रेस देशाचा वेळ घालवत आहे.

- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आई आणि मुलगा जामीनावर आहेत. सार्वजिनिक संपत्तीचं त्यांनी खासगी संपत्तीत रुपांतर केलंय.

- भ्रष्टाचारावर बोलण्याचा काँग्रेसला काहीही अधिकार नाही.

या आधी झालेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदीवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

First published: January 2, 2019, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading