अविश्वास ठरावाच्या वेळी शिवसेना अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती

अविश्वास ठरावाच्या वेळी शिवसेना अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती

शिवसेना खासदारांची बैठक संपली. सभागृहात उद्धव ठाकरे यांचा आदेश कळवला जाईल, त्यानुसार कृती करा, पूर्ण वेळ सभागृहात थांबा, असा मातोश्रीचा आदेश सांगून बैठक संपली.

  • Share this:

दिल्ली, 20 जुलै : शिवसेना खासदारांची बैठक संपली. सभागृहात उद्धव ठाकरे यांचा आदेश कळवला जाईल, त्यानुसार कृती करा, पूर्ण वेळ सभागृहात थांबा, असा मातोश्रीचा आदेश सांगून बैठक संपली. आज सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे ते लोकसभेत होणाऱ्या अविश्वास ठरावाकडे. नरेंद्र मोदी सरकारविरूद्धच्या अविश्वास प्रस्तावावर सरकारच्या बाजून उभं राहण्याचा निर्णय काल शिवसेनेनं घेतला होता पण यात ते तळ्यात मळ्यात होते. त्यावर आता 10:30 वाजता शिवसेना ठोस भूमिका घेणार होती.  खासदारांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे भूमिका मांडणार असल्यास खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना अनुपस्थित राहणार आहे.

सगळ्यांना उत्सुकता असलेल्या अविश्वास ठरावाची चर्चा साधारणतः सकाळी 11 वाजता सभागृहात सुरू होणार आहे. तर संध्याकाळी पंतप्रधान मोदी उत्तर देतील अशी माहिती मिळतेय. दरम्यान 314 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय. तर विरोधकांनी आतापर्यंत 230 खासदारांची मोट बांधल्याचं समजतंय. मात्र अविश्वासाच्या ठरावाची ही लढाई फक्त बहुमत चाचणीपुरती मर्यादीत नाही. तर मोदींना विरोध करणाऱ्या एनडीएतल्या घटक पक्षांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे आज स्पष्ट होईल. अर्थात त्यातलं पहिलं नाव आहे ते शिवसेनेचं.

First published: July 20, 2018, 10:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading