S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोकांनी 4 दिवसांचा भाजीपाला भरुन ठेवला, अयोध्येत काहीसं भीतीचं वातावरण
  • VIDEO : लोकांनी 4 दिवसांचा भाजीपाला भरुन ठेवला, अयोध्येत काहीसं भीतीचं वातावरण

    Published On: Nov 24, 2018 09:51 AM IST | Updated On: Nov 24, 2018 09:51 AM IST

    अयोध्या, 24 नोव्हेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या मुद्द्यावरुन सध्या अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यामुळे अयोध्यातल्या मुस्लीम समाजात थोडी धाकधुक आहे. काही जण दाराला कुलूप लावून निघून गेले आहेत. तर काहींनी 2-4 दिवसांचा भाजीपाला आधीच भरून ठेवला आहे. कारण याआधीही धार्मिक मुद्द्यावरुन तणाव निर्माण झाल्याचे अनेक प्रकार आपल्याकडे घडले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांनी खबरदारी म्हणून हा उपाय केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील आज अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. सकाळी ११ वाजता ते अयोध्येकडे कूच करतील. आज दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरेंचं फैजाबाद विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर अयोध्येतील त्यांच्या विविध नियोजित कार्यक्रमांची सुरुवात होईल. उद्धव ठाकरेंसोबत मुलगा आदित्य ठाकरेही आणि पत्नी रश्मी ठाकरे याही अयोध्येला जाणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close