राम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना

राम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न - शिवसेना

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना राम मंदिराच्या मुद्यावरून आक्रमक असून सेनेने भाजपला टार्गेट केलं आहे

  • Share this:

मुंबई 18 जानेवारी : राम मंदिराच्या मुद्यावर भाजपला वाचविण्याचा संघाचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलीय. भाजप संघाला ढाल म्हणून वापरत असल्याचं ते म्हणाले. राम मंदिराच्या मुद्यावर संघाचे सर कार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यवरही त्यांनी सकडून टीका केली.

सावंत म्हणाले, "जोशी यांचं वक्तव्य म्हणजे पुन्हा एक जुमला आहे. 2025 पर्यंत मंदिर पूर्ण होणार की सुरू करणार त्यातही संदिग्धता आहे. भाजप केवळ लोकांना फसवत आहे. पहिले मंदिर, नंतर सरकार हीच शिवसेनेची भूमिका कायम आहे."

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना राम मंदिराच्या मुद्यावरून आक्रमक असून सेनेने भाजपला टार्गेट केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जोशी यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेला भाजपला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे.

काय म्हणाले भैय्याजी जोशी?

राम मंदिराच्या निर्मितीसाठी अजुन थोडी वाट पाहावी लागेल. मंदिराचं काम 2025 पर्यंत पूर्ण होईल झालं पाहिजे असं मत संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलं होतं. प्रयागराज इथ सुरू असलेल्या कुंभमेळ्यात विंश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने या कामात पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.

भैय्याजी जोशी म्हणाले, " 2019 च्या निवडणुकीनंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल आणि 2025 पर्यंत ते बांधून पूर्ण होईल. राम मंदिराचं बांधकाम लवकरात लवकर सुरू व्हावं अशी कोट्यवधी हिंदूंची इच्छा आहे." ते पुढं म्हणाले 1952 मध्ये सोमनाथ मंदिराच्या बांधकामानंतर देशाने खूप प्रगती केली. राम मंदिराच्या निर्मितीनंतरही देश आणखी वेगाने प्रगती करेल.

जोशी यांच्या या वक्तव्यानतर वाद निर्माण झालाय. जोशी यांनी 2025 नंतर मंदिर बांधकाम सुरू होईल असं म्हटलं असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर स्पष्टीकरण देत जोशींनी आपण 2025 पर्यंत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल असं म्हटल्याचं स्पष्ट केलं. जोशी यांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर नाराजीही व्यक्त केली. या आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मंदिरातं बांधकाम लवकरात लवकरत सुरू करा असं म्हटलं होतं.

VIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता

First published: January 18, 2019, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading