मराठी बातम्या /बातम्या /देश /

Goa Election Result 2022 : गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीला मोठा झटका; 'नोटा'पेक्षाही कमी मतं?

Goa Election Result 2022 : गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीला मोठा झटका; 'नोटा'पेक्षाही कमी मतं?

God Assembly Election Result Updates : निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या 1.06% मतं आहेत.

पणजी 10 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळपासूनच (Goa Assembly Elections Result 2022) सुरूवात झाली आहे. राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर (BJP vs Congress in Goa) आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांचा हिरमोड होताना दिसत आहे. शिवसेना गोव्यात 12 जागांवर लढवत आहे. मात्र, सकाळी साडेदहा वाजेपर्यंत शिवसेनेला पाव टक्के मतं मिळाल्याचं चित्र आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या 1.06% मतं आहेत. सगळ्यात विशेष बाब म्हणजे नोटालाही या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. भाजपला गोव्यात सर्वाधिक मतवाटा मिळाला असून त्यापाठोपाठ काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक आहे.

UP Election: सर्वांत मोठा निकाल! मुस्लीमबहुल मतदारसंघातही मोदी-योगी आघाडीवर

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली?

भाजप (33.60%)

काँग्रेस (23.54%)

महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (8.60%)

आप (6.78%)

तृणमूल काँग्रेस (4.89%)

गोवा फॉरवर्ड पक्ष {1.14%}

राष्ट्रवादी (1.06%)

नोटा (1.17%)

शिवसेना (0.25%)

इतर (18.98%)

यूपीत भाजपची सत्ता, पण 60 जागेवर निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेचं काय झालं?

40 जागा असलेल्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे; मात्र आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमजीपी आदी पक्षांनी यावेळी जोर लावल्यामुळे सर्वांचं लक्ष निकालाकडे आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या; मात्र तरीही सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं होतं. अशात आता यावेळी कोणाचं सरकार येणार, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

First published:

Tags: Assembly Election, BJP, Goa, NCP, Shiv sena, काँग्रेस