Home /News /national /

राज्यभर 'शिवस्वराज्य दिन' साजरा होणार, बॉलिवूडला कोरोनाचा विळखा, शाळा पुन्हा बंद होणार?

राज्यभर 'शिवस्वराज्य दिन' साजरा होणार, बॉलिवूडला कोरोनाचा विळखा, शाळा पुन्हा बंद होणार?

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई. 6 जून : राज्यात सोमवार म्हणजेच 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. शंभर कोटी वसूल प्रकरणी अटकेत असलेला निवृत्त एपीआय सचिन वाझेला (Sachin Vaze) कोर्टाने माफीचा साक्षीदार घोषित केला आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची झोप उडाली आहे, असा गंभीर दावा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी पुन्हा एकदा खालच्या भाषेत टीका केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शाळा पुन्हा बंद होणार असल्याची चर्चा रंगत आहे. उत्तरकाशीमध्ये भयानक अपघात. 32 प्रवासी असलेली बस दरीत कोसळली. देशविदेशातील घडामोडी वाचा काही मिनिटांत. 6 जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार राज्यात सोमवार म्हणजेच 6 जून रोजी “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सोमय्यांची अनिल परबांवर खोचक टीका शंभर कोटी वसूल प्रकरणी अटकेत असलेला निवृत्त एपीआय सचिन वाझेला (Sachin Vaze) कोर्टाने माफीचा साक्षीदार घोषित केला आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची झोप उडाली आहे, असा गंभीर दावा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पडळकरांची शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी पुन्हा एकदा खालच्या भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. यंदा पंढरपूर वारी निघणारच, अजित पवार यांनी केली घोषणा राज्यात कोरोनाची चौथी लाट (fourth wave of coronavirus) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, अजूनही राज्य सरकारने निर्बंध लावण्याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशातच गेल्या दोन वर्षांपासून रखडेलेली पंढरपूर वारी (pandharpur wari) यंदा होणारच असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उत्तरकाशीमध्ये 32 प्रवाशांनी भरलेली मिनीबस दरीत कोसळली उत्तराखंडच्या उत्तरकाशी तिर्थयात्रेसाठी निघालेली एक मिनीबस दरीत कोसळली आहे. या मिनीबसमध्ये 32 भाविक होते. या भाविकांपैकी बहुतेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा शाळा बंद होणार? कोरोनाच्या वाढत्या रुग्ण परिस्थितीवर शाळा पुन्हा बंद होणार का? कॉलेजेसच्या परीक्षा होणार का? शाळा बंद झाल्यात तर विद्दयार्थ्यांचं शिक्षण कसं होणार? याबाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. तिसरी जागा आम्हीच जिंकणार, शेलारांचा दावा राज्यसभेची रणनीती ठरवण्यासाठी राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर तिसरी जागा आम्हीच जिंकू, सेनेचे संजय जिंकणार नाही, असा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! बॉलिवूडमध्ये मात्र कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाल्याचे दिसून येत आहे. अक्षय कुमार, कर्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला ( Shah Rukh Khan tests positive Covid-19 ) देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Bollywood, Chhatrapati shivaji maharaj, Corona

    पुढील बातम्या