Home /News /national /

अवघ्या 6 मिनिटांत पार पडला शिवराज सिंह यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा

अवघ्या 6 मिनिटांत पार पडला शिवराज सिंह यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा

ऐरवी थाटामाटात होणारा मुख्यमंत्रिपदाचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 6 मिनिटांत उरकण्यात आला

    भोपाळ, 23 मार्च : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते शिवराजसिंह चौहान (Shivrajsingh Chouhan) यांनी आज मध्य प्रदेशच्या (MP) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवराज सिंह यांनी चौथ्यांदा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर येऊन इतिहास रचला आहे. ऐरवी थाटामाटात असणारा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा अवघ्या 6 मिनिटांत संपवला. कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर शिवराज सिंह यांनी हा सोहळा लवकर उरकला. शिवाय आज त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याने शपथ घेतली नाही. राजभवन येथील समारंभात राज्यपाल टंडन यांच्या उपस्थितीत  शिवराज सिंह यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी कमलनाथ यांच्याव्यतिरिक्त काही नेमकेजण उपस्थित होते. हे वाचा - कोरोनाला हरवण्यासाठी डॉक्टरांवर आधारित या प्रसिद्ध सिरीजची मोठी मदत यापूर्वी मध्य प्रदेशातील भाजप आमदारांना आज सायंकाळी पक्षाच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. या बैठकीत शिवराज सिंह चौहान यांची पक्षाच्या नव्या नेत्याच्या रुपात निवड करण्यात आली. यावेळी पक्षाच्या पर्यवेक्षकांनी दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून आमदारांशी बातचीत केली. यापूर्वी शिवराज सिंह हे 2005 ते 2018 या काळात सलग 13 वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. 20 मार्च रोजी कमलनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत शिवराज सिंह हे सर्वात प्रबळ दावेदार होते. शिवराज यांच्या व्यतिरिक्त आतापर्यंत अर्जुन सिंग आणि श्यामाचरण शुक्ला तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. देश आणि जगभरात कोरोनाचा धोका असल्यामुळे हा कार्यक्रम थोडक्यात उरकण्यात आला. काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये जाताच कमलनाथ यांचे सरकार 15 महिन्यात पडले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच बरोबर असे आणखी बरेच आमदार आहेत जे पक्ष सोडू इच्छितात. त्यापैकी बहुतेक असे आमदारांची कॉंग्रेसप्रती निष्ठा कमीच राहिली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Coronavirus, Madhya pradesh

    पुढील बातम्या