‘काँग्रेस या बुडत्या जहाजातून उडी मारून पळणारे राहुल गांधी पहिले नेते’

Rahul Gandhi : शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 11:58 AM IST

‘काँग्रेस या बुडत्या जहाजातून उडी मारून पळणारे राहुल गांधी पहिले नेते’

मुंबई, 28 जून : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत त्यावरून त्यांनी हा निशाणा साधला. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे आणि या बुडत्या जहाजातून उडी मारून पळणारे राहुल गांधी हे पहिले नेते असल्याची टीका शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. शिवाय, काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण? याबद्दल कुणालाही काही माहिती नसल्याचं शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. जहाज बुडत असताना त्याला वाचवणं, त्यावर शेवटपर्यंत राहणं हे कॅप्टनचं काम असतं. पण, राहुल गांधी हे मात्र पळ काढत असल्याची टीका शिवराजसिंह चौहान यांनी केली.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 8 कोटी PF धारकांना बसेल मोठा धक्का

राहुल गांधींच्या जागी कोण?

दरम्यान, लोकसभेत झालेल्या पराभवामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. राहुल गांधी यांच्या जागी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आहे. शिवाय, काँग्रेस कार्यकारी अध्यक्षाची देखील निवड करू शकतं.

स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये; SNB Reportमधून खुलासा

Loading...

भाजपचं अभियान

देशात भाजपची ताकद आणखी वाढवण्यासाठी देशात 35 दिवसांचं विशेष असं अभियान चालवलं जाणार आहे. 6 जुलै पासून सुरू होणारं हे अभियान 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे. दरम्यान, ज्या राज्यांमध्ये भाजपची ताकद कमी आहे अशा राज्यांवर या अभियानामध्ये लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पॉण्डेचरी, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू – काश्मीर आणि सिक्कीमवर भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे.

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...