भोपाळ, 22 मार्च : शिवपुरी जिल्ह्यातल्या कोलारसमधील चिलावद गावात १७ जण १८ मार्चला मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर असलेल्या चंबळ नदीत वाहून गेले होते. यातील १० जण सुरक्षित बाहेर आले पण ७ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. स्थानिक प्रशासनाने १८ मार्चला बचावकार्य सुरू केलं होतं. मंगळवारी १२ वर्षीय लवकुशचा मृतदेह सापडला.
चंबळ नदीत बुडालेले सर्व लोक करोलीतील कैला देवीच्या मंदिरात दर्शनासाठी शिवपुरी जिल्ह्यातून निघाले होते. तेव्हा मध्य प्रदेशातील चंबळ नदी ओलांडताना ते वाहून गेले होते. दुर्घटनेत १२ वर्षांच्या लवकुशचा शोध घेतला जात होता. २१ मार्च रोजी अखेरचा मृतदेह आढळल्यानंतर बचावकार्य थांबवण्यात आलं. या दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेसुद्धा हळहळले.
चक्क यज्ञ आणि हवनातून सेंद्रिय शेती, कुठे होतोय हा प्रयोग
देवकीनंदन कुशवाह, कल्लो कुशवाह यांचे मृतदेह १८ मार्चला आढळले होते. त्यांच्यावर चिलावद गावात अंत्यसंस्कारही करण्यात आले. तर १९ मार्च रोजी अलोपा कुशवाह यांचा मृतदेह सापडला होता. सलग तीन दिवस मृतदेह आढळून येत होते.
चंबळ नदीत २० मार्चला रश्मी कुशवाह हिचा मृतदेह बचावपथकाला सापडला होता. तिच्यावर २१ मार्च रोजी अंत्यंसस्कार केले गेले. तर बृजमोहन कुशवाह यांचाही मृतदेह आढळून आला होता. मृतदेह नदीतून बाहेर काढल्यानंतर तो बृजमोहन यांच्या गावी पाठवण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh