शिवपुरी- धबधब्याजवळ अडकलेल्या ४५ जणांची १० तासांनी सुटका,

शिवपुरी- धबधब्याजवळ अडकलेल्या ४५ जणांची १० तासांनी सुटका,

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पिकनिकसाठी हे लोक सुलतानगढ धबधब्यावर गेले होते

  • Share this:

मध्य प्रदेश, १६ ऑगस्ट- मध्य प्रदेश येथील शिवपुरी जिल्ह्यातील सुलतानगढ धबधब्यावर पिकनिकसाठी गेलेल्या ४५ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पिकनिकसाठी हे लोक सुलतानगढ धबधब्यावर गेले होते. यातील ५ लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एअरलिफ्ट केले. तर ४० लोकांना रशीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजता ४० लोक या धबधब्यात पिकनिकचा आनंद लूटत होते. दरम्यान, पाऊसामुळे अचानक पाण्याची पातळी वाढली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले. याच गोंधळात ११ लोक वाहून गेले तर ३४ लोक धबधब्याच्यामध्ये अडकले. या सर्वांची जवळपास १० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाचवण्यात आले. एनडीआरएफ, आईटीबी, बीएसएफचे जवान आणि स्थानिकांत्या मदतीने धबधब्याच्या परिसरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. या रेस्क्यू ऑपरेशदरम्यान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि मंत्री यशोधरा राजेही उपस्थित होते.

हेही वाचा-

इशारा न देता धबधब्यात सोडलं पाणी, 30 पर्यटक अडकले, 6 गेले वाहून !

वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून स्वातंत्र्य दिनी रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या

First published: August 16, 2018, 8:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading