Mob Lynching : रस्त्यावर शौचास बसल्यामुळे दोन दलित मुलांची समूहाने केली हत्या

Mob Lynching : रस्त्यावर शौचास बसल्यामुळे दोन दलित मुलांची समूहाने केली हत्या

त्याची माहिती गावकऱ्यांना कळताच काही गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली आणि त्या लोकांनी मुलांना लाठ्या काठ्यांनी मारायला सुरूवात केली. या घटनेत त्या दोन मुलांचा मृत्यू झाला.

  • Share this:

शिवपूरी  25 सप्टेंबर : मॉब लिंचिंग (Mob Lynching) विरुद्ध देशभर कितीही गदारोळ झाला तरी त्या घटनांमध्ये काहीही घट झालेली नाही. रस्त्यावर शौचास बसल्यामुळे दोन दलित मुलांची काही लोकांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात उघडकीस आलीय. या घटनेमुळे राज्य हादरून गेलं असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होतेय. सिरसौद जवळच्या भावखेडी (Bhavkhedi Village) इथली ही घटना आहे. भावखेडीच्या गावाबाहेरच्या रस्त्यावर दोन मुलं शौचास बसली होती. त्याची माहिती गावकऱ्यांना कळताच काही गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली आणि त्या लोकांनी मुलांना लाठ्या काठ्यांनी मारायला सुरूवात केली. या घटनेत त्या दोन मुलांचा मृत्यू झाला.

उदयनराजेंना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी!

या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी आरोपींना अटक केलीय. रोशनी (12) आणि अविनाश (10) अशी पीडित मुलांची नावं आहेत. पोलिसांनी  हाकीम आणि रामेश्वर या आरोपींना अटक केलीय. रोशनी आणि अविनाश ही मुलं सकाळी शौचास बाहेर गेली होती. आरोपींनी त्यांना पाहिलं आणि ते काठ्या घेऊन आले. त्यांनी दोघांना मारायला सरुवात केली. त्यात ते दोघही गंभीर जखमी झाले.

इम्रान खान यांची भाषा बदलली, म्हणाले, आम्ही भारतावर हल्ला करणार नाही

नंतर लोकांनी त्या दोघांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यांचा उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता अशी माहिती दिली जातेय. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार असून त्यांना कडक शिक्षा होईल अशी काळजी घेतली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 25, 2019, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading