दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात उंच किलीमांजरो पर्वतावर 'असा' साजरा झाला शिवजन्म सोहळा!

दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात उंच किलीमांजरो पर्वतावर 'असा' साजरा झाला शिवजन्म सोहळा!

दक्षिण अफ्रिका प्रांत पादाक्रांत करून साजरा केलेल्या या शिवजन्म सोहळ्याचं ड्रोन शूट न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षाकांसाठी

  • Share this:

22 फेब्रुवारी : बातमी आहे भारतीयांच्या अभिमानाची. पिंपरी-चिंचवडच्या गिर्यारोहक तरुणांनी चक्क दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया स्थित असलेल्या सर्वात उंच किलीमांजरो पर्वतावर शिवजन्म सोहळा साजरा केला आहे. या अनोख्या सोहळ्यामुळं प्रत्येकाच्या हृदयात असलेल्या शिवरायांच्या जयघोषाणं अवघं किलीमांजरो पर्वत दुमदुमुन निघालं.

अफ्रिकेतील माऊंट किलीमांजरो हे समुद्र सपाटीपासून तब्बल 5,895 मीटर उंच आहे. त्यामुळे हा पर्वत सर करण्याचं धाडस खुप कमी गिर्यारोहकांनी दाखवलं आहे. या सगळ्यात आणखी महत्वाचं म्हणजे मायनस 8 तापमान असलेल्या या ठिकाणीची अशी अतिशय कठीण चढण पार करून सह्याद्रीचे मावळे अनिल वाघ, क्षितीज भावसार आणि रवी जांभूळकर यांनी ही मोहीम फत्ते केली आहे.

दक्षिण अफ्रिका प्रांत पादाक्रांत करून साजरा केलेल्या या शिवजन्म सोहळ्याचं ड्रोन शूट न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षाकांसाठी...शिवरायांच्या जयंतीची आठवण आणि सोहळा अटकेपार साजरा करणाऱ्या या मावळ्यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा.

First published: February 22, 2018, 8:21 AM IST

ताज्या बातम्या