तेलंगणातल्या कृष्णाच्या स्वप्नात आले ट्रम्प, आता मंदिर बांधून 6 फुट मूर्तीची करतो पूजा

तेलंगणातल्या कृष्णाच्या स्वप्नात आले ट्रम्प, आता मंदिर बांधून 6 फुट मूर्तीची करतो पूजा

आता ट्रम्प भारतात येणार असल्याने त्याला आपल्या दैवताला भेटायचं असून त्याने त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगीही मागितली आहें.

  • Share this:

हैदराबाद 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीवर आले आहेत. दोन दिवस ते भारतात राहणार आहेत.  देशात ट्रम्प यांच्या दौऱ्याची चर्चा असतानाच तेलंगणातल्या त्यांच्या एका भक्ताची कथा समोर आलीय. या भक्ताने डोनाल्ड ट्रम्प यांचं एक मंदिर तयार केलंय. त्यात ट्रम्प यांची 6 फुटांची मूर्ती त्याने बसवलीय. त्याची तो दररोज पूजा करतो. ट्रम्प हे मला देवासारखेच असून त्यांच्या पूजेमुळे माझं कल्याण होईल असं त्याला वाटतं.

तेलंगणातल्या कोन्ने इथला बुसा कृष्णा असं त्या ट्रम्पवेड्या भक्ताचं नाव आहे. आपल्या गावात आणि परसरात तो रियल इस्टेट एजंटचं काम करतो. त्याच्या या ट्रम्प भक्तीमुळे तो आता सगळ्या परिसरात विख्यात झालाय. ट्रम्प हे अध्यक्ष होण्याआधी व्यावसायीक होते आणि रिअल इस्टेटमध्ये त्यांची मोठी उलाढाल आहे.

तो ट्रम्प यांचा का भक्त झाला? असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तरही मजेदार आहे. एक दिवस ट्रम्प त्याच्या स्वप्नात आले होते. त्यानंतर तो त्यांच्या प्रेमात पडला आणि नंतर भक्तच झाला. त्यानंतर त्याने त्याच्या अंगणात त्यांचं मंदिर बांधलं आणि 6 फुटांचा पुतळाही बसवलाय. त्याची तो दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करतो आणि दुधाचा अभिषेकही करतो.

कृष्णाच्या घरच्या लोकांनी त्याला विरोध केलाय. पण तो आता कुणाचच ऐकत नाही. तुम्ही जसं राम-कृष्ण आणि शिवाची पूजा करता तसं ट्रम्प हे माझ्यासाठी आहेत असं त्याने उत्तर दिलंय. आता ट्रम्प भारतात येणार असल्याने त्याला आपल्या दैवताला भेटायचं असून त्याने त्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगीही मागितली आहें.

हेही वाचा...

आजोबांना सलाम! वयाच्या 93 व्या वर्षी घेतली मास्टर्सची डिग्री, आता तयारी एमफिलची!

अयोध्या राम मंदिराचा मुहूर्त कधी? आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत होणार फैसला

राम मंदिरासाठी जमा झालेल्या सोन्या, चांदीच्या विटा सरकारी समितीला दिल्या जाणार?

First published: February 19, 2020, 10:35 AM IST

ताज्या बातम्या