मराठी बातम्या /बातम्या /देश /शिवसेनेला मोठा धक्का, संसदेतील कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा!

शिवसेनेला मोठा धक्का, संसदेतील कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा!

शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी केली होती.

शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी केली होती.

शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी केली होती.

नवी दिल्ली, 28 जुलै : शिवसेनेमध्ये बंडखोरीमुळे मोठी वाताहत झाली आहे. आमदार, खासदारांपाठोपाठ स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाची वाट निवडली आहे. अशातच शिंदे गटाने आता संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ खासदारांचाही वेगळा गट स्थापन केला आहे. 12 खासदार हे शिंदे गटात सामील झाले आहे. लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मान्यता दिली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाने संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे. शिंदे गटातील खासदारांनी कार्यालयावर ताबा मिळवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी केली होती.

19 जुलै रोजी शिवसेनेचे हे 12 खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जाऊन भेटले आणि पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांची लोकसभेत गटनेता म्हणून तर भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड व्हावी, अशी मागणी केली होती. ही मागणी आता लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवाळे यांना गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोदपदी मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदार अडचणीत आले आहेत. शिवसेनेच्या या 6 खासदारांना लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप मान्य करावा लागेल. या 6 खासदारांनी व्हिप मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते.

दरम्यान, लोकसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या खासदार गटाला मान्यता दिल्यामुळे शिवसेनेनं याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

First published:
top videos