काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मोदी सरकारमधील एकमेवर मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच शिवसेना NDAतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे बोलले जात होते. आता सेनेने NDAच्या बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा परिणाम प्रथमच दिल्लीतील संसदीय राजकारणात दिसून येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपला शिवसेनेची साथ नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. संसदेतील अनेक विधेयकांसाठी काँग्रेस आघाडीच्या UPAविरुद्ध शिवसेनेची साथ गरजेची असते. आता बैठकीला उपस्थित न राहून शिवसेनेने NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या या निर्णयाचा थेट फायदा UPAला होऊ शकतो अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे संसदेतील गटनेते सर्व पक्षीय बैठकीस उपस्थित राहणार आहेत. मात्र सेनेने NDAच्या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री करायचं तरी कोणाला? शिवसेनेसमोर यक्ष प्रश्न महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सरकारमध्ये समान वाटा हवा यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद निर्माण झाला. भाजप मुख्यमंत्रीपदावर तडजोड करण्यास तयार नाही. तर शिवसेना लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरल्याप्रमाणे वागा असा हट्ट करत आहे. भाजप आणि सेना यांनी वेगळ होण्याचे ठरवल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापनेचा विचार करत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील ती मान्य करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.Shiv Sena leader Sanjay Raut on being asked if Shiv Sena will go for NDA meeting in Delhi ahead of Parliament session?: No, Shiv Sena will not go. pic.twitter.com/5NbDmFRe50
— ANI (@ANI) November 16, 2019
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, NDA, Sanjay raut, Shiv sena