मराठी बातम्या /बातम्या /देश /

बिहारमध्ये शिवसेनेची काँग्रेसला साथ? गुप्तेश्वर पांडेंच्या विरोधातही उमेदवार देणार

बिहारमध्ये शिवसेनेची काँग्रेसला साथ? गुप्तेश्वर पांडेंच्या विरोधातही उमेदवार देणार

Bihar Assembly Election 2020 : देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून निवडणुकीचं नियोजन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची बदनामी करू नये असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

Bihar Assembly Election 2020 : देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून निवडणुकीचं नियोजन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची बदनामी करू नये असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

Bihar Assembly Election 2020 : देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून निवडणुकीचं नियोजन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची बदनामी करू नये असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 07 ऑक्टोबर:  बिहार विधान निवडणुकीत (Bihar Assembly Election 2020) शिवसेना (Shivsena) उतरणार आहे. विधानसभेच्या 50 जागांवर सेना आपले उमेदवार उभे करतील अशी घोषणा शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केली आहे. बिहारमधले स्थानिक पक्ष हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पक्षांबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं. बिहारमध्ये काँग्रेस (Congress) आणि शिवसेना एकत्र येत निवडणूक लढवू शकते असे संकेतही त्यांनी दिलेत.

देसाई म्हणाले, सुशांत सिंह प्रकरणात खोटा प्रचार करण्यात आला. खोटी माहिती पसरविण्यात आली. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं गेलं, पण आता सगळं चित्र स्पष्ट झालं आहे.

देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून निवडणुकीचं नियोजन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची बदनामी करू नये असा टोलाही त्यांना हाणला. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या विरोधातही शिवसेना आपला उमेदवार देणार आहे.

बिहारमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नाही तसेच चिन्ह दुसऱ्या पक्षाचे असल्याने आयोग देईल त्यातलं एक चिन्ह आम्ही निवडू अशी माहितीही त्यांनी दिली.

सुशांत सिंह हा बिहारचा असल्याने त्याच्या मृत्यू प्रकरणावरून बिहारमध्ये मोठं राजकारण झालं होतं. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे असं म्हणत भाजप आणि जनतादल युनायटेडने हा मुद्दा प्रचारात उतरविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आणि एम्सच्या निर्वाळ्यानंतर परिस्थिती बदलली आहे.

अखेर भारतीयांनी कोरोनाविरोधातील उपचार शोधलाच! क्लिनिकल ट्रायललादेखील मंजुरी

दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांचं नेतृत्व मान्य नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार नसल्याचं पक्षाने जाहीर केले आहे. चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

LJP हा NDAमधून बाहेर पडला तरीही त्या पक्षाने भाजपची साथ सोडलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपशी संबंध कायम राहणार असल्याचं पासवान यांच्यावतीने सांगण्यात आलं आहे. पासवान यांनी राज्यात भाजप आणि लोकजनशक्तीचं सरकार आणू असंही म्हटलं आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून जेडीयू आणि पासवान यांच्या पक्षात मतभेद झाल्याने पासवान यांनी हा निर्णय घेतला आहे.

हाथरस घटनेनंतर राज्यात दंगली भडकविण्याचा कट उघड, विदेशातून आला 100 कोटींचा निधी

त्यांनी राज्यात जास्त जागांची मागणी केली होती. तर नितिश कुमार हे तेवढ्या जागा सोडायला तयार नव्हते. त्यामुळे पासवान यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री पासवान हे आजारी आहेत. त्यामुळे पक्षाची सर्व सूत्र ही चिराग यांच्याकडे आहेत.

First published:

Tags: Bihar Election, Shivsena